गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच सरकारकडूनही सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. "गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो. पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन," अशा आशयाचं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 21:43 IST
Raju Patil : संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहन
मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण
ठळक मुद्देसंपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहनगेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ