शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:28 IST

Maharashtra Nagar Parishad Election Results news:भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

चंद्रपुरात मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, खा.प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षाने माझी शक्ती कमी केली, मुनगंटीवार यांची नाराजीहा पराजय मी नम्रपणे स्वीकारतो. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण तयार होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणामध्ये दिसले, असे मुनगंटीवार म्हणाले.

पटोले अन् फुके यांनी जिंकली मनेगोंदिया जिल्ह्यात गोंदियासह तीन ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवत भाजप आणि अजित पवार गटाला धक्का दिला, याचे श्रेय माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना दिले जात आहे. बाजूच्या भंडारा जिल्ह्यात भाजपने चारपैकी दोन नगराध्यक्षपदे आ.परिणय फुके यांच्या नेतृत्वात जिंकली.

फडणवीस यांच्या नागपुरात मुसंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले. २७ पैकी २२ ठिकाणी कमळ फुलले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल (शिंदेसेना) यांनी रामटेक, पारशिवनीत धनुष्यबाण आणले. काँग्रेस एकावर समाधान मानावे लागले. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या वर्धेत कमळ हरले.

प्रा. राम शिंदे यांची रोहित पवारांवर मातराधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपने १२ पैकी सात ठिकाणी विजय मिळविला. जामखेडमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवार यांच्यावर मात केली. तेथे नगराध्यक्षपद आणि १५ जागा भाजपने जिंकल्या. लातूरमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले.

तटकरे, राणे यांना कोकणात धक्काफलटणवर (जि.सातारा) वर्षानुवर्षे वर्चस्व असलेले शरद पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना दणका बसला. तिथे भाजप जिंकला. ईश्वरपूरमध्ये (जि.सांगली) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी एकहाती सत्ता मिळविली. मंत्री नितेश राणे यांना कणकवलीच्या गडात धक्का बसला. तिथे सर्वपक्षीय आघाडीचे संदेश पारकर नगराध्यक्ष झाले. रायगडमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तिथे दहापैकी दोनच नगराध्यक्ष त्यांच्या पक्षाचे जिंकले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Munugantiwar feels weakened by party; leaders' prestige at stake.

Web Summary : Local election results mixed; Congress gains in Gondia, BJP successful in Nagpur. Key leaders faced setbacks in Konkan, while Ram Shinde defeated Rohit Pawar. Munugantiwar expressed dissatisfaction.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा