लोहा : ‘घराणेशाही संपवू’ असा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच लोहा नगरपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचा फटका बसला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल सहा उमेदवार भाजपने मैदानात उतरवले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, मतदारांनी भाजपचा धुव्वा उडवला असून, या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत नगराध्यक्षपदासह तब्बल १७ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक आणि काँग्रेसला एक अशी प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे.
असा बसला फटका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी हे उमेदवार होते. तर नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग ७ अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग १ अ), भावजय सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग ८ अ), मेहुणा युवराज वाघमारे (प्रभाग ७ ब) आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे (प्रभाग ३) या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, मतदारांनी या सर्व उमेदवारांना स्पष्ट नाकारले असून सहाहींचा पराभव झाला आहे.
दिग्गजांच्या सभा तरी झाला पराभवनिवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या जाहीर सभा आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कॉर्नर बैठका घेऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.
Web Summary : In Loha, BJP's anti-dynasty push backfired as all six candidates from one family lost. NCP, led by MLA Prataprao Patil Chikhlikar, secured a majority, winning 17 seats. Despite rallies by BJP leaders, voters rejected the family's bid.
Web Summary : लोहा में, भाजपा का वंशवाद विरोधी अभियान विफल रहा क्योंकि एक ही परिवार के सभी छह उम्मीदवार हार गए। विधायक प्रतापराव पाटिल चिखलीकर के नेतृत्व में एनसीपी ने बहुमत हासिल किया, 17 सीटें जीतीं। भाजपा नेताओं की रैलियों के बावजूद, मतदाताओं ने परिवार की बोली को खारिज कर दिया।