महाराष्ट्र शासन माझी प्रेयसी!
By Admin | Updated: April 11, 2015 02:38 IST2015-04-11T02:38:41+5:302015-04-11T02:38:41+5:30
मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम आणि मराठी चित्रपटांसाठी त्यात अढळपद याबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून उठलेले मोहोळ निदान सोशल

महाराष्ट्र शासन माझी प्रेयसी!
मुंबई : मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम आणि मराठी चित्रपटांसाठी त्यात अढळपद याबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून उठलेले मोहोळ निदान सोशल मीडियावर ‘डे बाय डे’ गाजत राहण्याची लक्षणे आहेत. या विषयावर पडू लागलेले टिष्ट्वट्स त्याचीच प्रचिती देत आहेत. किंबहुना वक्रोक्तीपूर्ण कडवट प्रतिभेला जणू बहर आला आहे. ‘महाराष्ट्र शासन मी काय खावे आणि कोणता चित्रपट पाहावा, यावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे महाराष्ट्र शासन माझी प्रेयसीच आहे,’ हे टिष्ट्वट म्हणजे त्याचाच नमुना!
केवळ प्राइम टाइमचा मुद्दा, त्यानंतर शोभा डे आणि शिवसैनिकांमध्ये सुरू झालेली जुगलबंदी, आरोप-प्रत्यारोप, प्रतिकात्मक भेटी आणि वडापावपुरता हा विषय मर्यादित राहिलेला नाही. थिएटरमध्ये पॉपकॉर्नची जागा दहीमिसळ वा वडापावने घेण्याच्या सरकारी इच्छेवर तर गरम लाह्या फुटण्यास सुरुवात झाली आहे.गेले दोन ते तीन दिवस विविध क्षेत्रातील लोकांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्याने हा विषय ट्रेंडिगमध्ये होता. (प्रतिनिधी)