शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

“इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही,” आव्हाडांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 12:47 IST

अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यावर भाष्य केलं. “अशा गोष्टींमुळे सर्व स्तरांमध्ये चिड निर्माण होते. समजाता वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये चिड निर्माण होते. जे आमच्या भगिनीनं लिहिलंय ते वाचवतही नाही. त्यांना कदाचित माहित नसेल शरद पवार यांचे तीन ऑपरेशन झाले आहेत. त्यातून ते बाहेर आलेत. अशा परिस्थितीतही ते गावखेड्यात शेतात जातात, सभा घेतात. ते देखील ८३ व्या वर्षी. त्यांच्या पत्नीही वाचत असतील ना या सर्व गोष्टी, मुलगीही पाहत असेल. त्यांना हृदय नाही का, आपलं असं काहीच नाही का?,” असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अभिनेत्री केतकी चितळे हीच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“ते मनानं खुप मोठे आहेत. तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. त्यांची लाळ गळतेय, त्यांना नरक मिळालं पाहिजे, ८३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तुम्ही असं बोलू शकत नाही. कोणाच्या व्यंगावर आजारावर टीका करायची नाही हे आपल्याला महाराष्ट्र धर्मानंच शिकवलं आहे,” असंही ते म्हणाले.राऊतांकडूनही टीका"काही व्यक्ती हिमालयाएवढ्या असतात. काही व्यक्ती सूर्याच्या तेजासारख्या तळपत असतात. सूर्यावर कुणी थुंकलं किवा हिमालयाला कुणी तोंड वेंगाळून दाखवलं तर हिमालय आणि सूर्याचं महत्व काही कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत यांना वेगळ्या प्रकारची नशा कुणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात असे क्षुद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली की ते हवेबरोबर उडून जातील", असं संजय राऊत म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. 

केतकी चितळेवर गुन्हा दाखलराष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडKetaki Chitaleकेतकी चितळेSharad Pawarशरद पवार