शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये; केंद्रातील कुंभकर्ण सरकारला केव्हा जाग येणार?; जयंत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:37 IST

Jayant Patil : जयंत पाटील यांनी World Sleep Day च्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारला विचारले अनेक प्रश्न

ठळक मुद्देजयंत पाटील यांनी World Sleep Day च्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारला विचारले अनेक प्रश्नअर्थव्यवस्था, पेट्रोस-डिझेल दरवाढीवरून केंद्राला विचारले प्रश्न

देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 'वर्ल्ड स्लीप डे' असं टॅग करत जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला कुंभकर्णाची उपमा देत पाटील यांनी टोला लगावला. "शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?," असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. दरम्यान, १९ मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे म्हणून ओळखला जातो. जयंत पाटील यांनीदेखील आपल्या ट्वीटमध्ये वर्ल्ड स्लीप डे असं टॅग केलं आहे.यापूर्वीही साधला होता निशाणायापूर्वी जयंत पाटील यांनी कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. भारतात लस नसली तरी चालेल, पण परदेशात पाठवा असं केंद्राचं धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEconomyअर्थव्यवस्थाGovernmentसरकारPetrolपेट्रोलDieselडिझेलCylinderगॅस सिलेंडरTwitterट्विटर