महाराष्ट्र वैद्यकीय परिषद होणार ‘डिजिटल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:20 AM2018-08-13T06:20:57+5:302018-08-13T06:21:11+5:30

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अ‍ॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे.

Maharashtra Medical Council to hold 'Digital' | महाराष्ट्र वैद्यकीय परिषद होणार ‘डिजिटल’

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद होणार ‘डिजिटल’

Next

मुंबई : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रवैद्यकीय परिषदेने अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अ‍ॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता लवकरच या काऊन्सिलचे प्रत्येक व्यवहार, नूतनीकरण व प्रक्रिया आॅनलाइन माध्यमातून होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, आतापर्यंत सात लाख कागदपत्रांची माहिती आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणखी चार लाख कागदपत्रे डिजिटल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. १९३० सालापासूनची कागदपत्रे परिषदेकडे आहेत, एखादे कागदपत्र मिळविण्यासाठी, शोधण्यासाठी जवळपास १५-२० दिवस लागतात. त्यामुळे हा मनस्ताप दूर करण्यासाठी आता डिजिटल पद्धत अवलंबिण्यात येत आहे. या डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या डॉक्टरविषयीची तक्रार, डॉक्टरची संपूर्ण माहिती, डॉक्टरांच्या परवान्याचे नूतनीकरण, शुल्क भरणे, नागरिकांच्या तक्रारींसाठीही सोपी पद्धत अंतर्भूत आहे. या डिजिटायझेशनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्या सदस्याला आयडी कार्ड आणि क्यूआर कोड देण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यातील डॉक्टरांसाठी सीएमए सर्टिफिकेट कोर्सही आॅनलाइन सुरू करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या उपस्थितीसाठी वेबकॅम असणे आवश्यक असते. त्यामुळे सीएमएच्या चर्चासंत्रामध्ये सहजरीत्या सहभागी होता येईल, अशी माहिती डॉ. उत्तुरे यांनी दिली.

सीएमएचा आॅनलाइन अभ्यासक्रम
आॅनलाइन सीएमए अभ्यासक्रमात डॉक्टरांना किमान ७० मिनिटे तरी कॅमेऱ्यासमोर बसावे लागते. जेणेकरून त्यांची उपस्थिती आहे हे कळते. शिवाय, त्यातच त्यांना पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, ज्यानंतर त्यांना
ई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाते. डिजिटायझेशनच्या पद्धतीमुळे परिषदेच्या व्यवहारांत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा मानस असल्याचे
डॉ. उत्तुरे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Medical Council to hold 'Digital'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.