शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लगीन घाईत 'नवरी'चाच विसर! नवरीला एक्स्प्रेसमध्ये विसरुन व-हाडी मंडपात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 13:42 IST

लग्न म्हटलं की लगीन घाई आलीच. मुलीच्या लग्नासाठी नागपूरहुन नाशिककडे निघालेल्या वऱ्हाडाची मात्र भलतीच लगीन घाई झाली.

- मनीषा म्हात्रे  मुंबई - लग्न म्हटलं की लगीन घाई आलीच. मुलीच्या लग्नासाठी नागपूरहुन नाशिककडे निघालेल्या वऱ्हाडाची मात्र भलतीच लगीन घाई झाली. एक्सप्रेसने नागपुरहून नाशिककडे वऱ्हाड नवऱ्या मुलीला घेऊन निघाले. पण, नाशिक येताच इतकी घाई झाली की नवरी मुलगी ट्रेनमध्येच राहिली आणि वऱ्हाडने मंडप गाठले. तेथे गेल्यानंतर नवरीचा शोध सुरु झाला. नाशिक स्थानक आले तेव्हा नवरी टॉयलेटमध्ये गेली होती, पण हे वऱ्हाडाच्या लक्षात न आल्याने ते नाशिकला उतरून आणि नवरी थेट इगतपुरीला पोहचली. डब्यात मुलीला रडताना पाहून इगतपुरी पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सूखरूप तिला लग्नमंडपात पोहचविले.         नागपुरच्या गोपाळ पेठ मध्ये मिरगे कुटुंबिय राहतात. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.रविवारी दुपारी १ वाजता नाशिक रोडयेथे मुलगी रजनीचा विवाह सोहळा होता. सकाळच्या एक्सप्रेसने व-हाड़ नवरीला घेउन नागपुरहून नाशिककड़े यायला निघाले. त्याच दरम्यान सकाळी साडे आठच्या सुमारास एक्सप्रेस नाशिक रोडवर आली. त्यापूर्वीच  नवरी बाथरूममध्ये गेली. इथे स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात ते नवरीला बाथरूममध्येच सोडुन निघाले. व-हाडाने मंडप गाठले. तेथे गेल्यानंतर नवरीच ग़ायब असल्याने सर्वाच्याच भुवया उँचावल्या. मंडपात नवरीचा शोध सुरु झाला. फोनाफोनी सुरु झाली.         हा शोध सुरु असताना इथे बाथरूममधुन बाहेर आलेल्या नवरीच भलतीच तारांबळ उडाली. व-हाडी न दिसल्याने ती घाबरली. अनोळख़ी चेहरे पाहुन तिही रड़ु लागली. अशातच इगतपूरी स्थानक येताच रेल्वे पोलिसांकडून सामानाची झड़ती सुरु झाली. त्याच दरम्यान पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळूंखे यांचे लक्ष रजनीकड़े गेले. त्यांनी तिच्याकड़े विचारपूस केली. मात्र घाबरलेली रजनी हंबरडा फोडून फ़क़्त नाशिकला उतरायचे होते असे सांगत होती. जाधव तिला घेउन आरपीएफ कक्षात आले. तेथे तिला विश्वासात घेत चौकशी सुरु केली तेव्हा वरील घटनाक्रम उलगडला. त्यांनी तत्क़ाळ तिने दिलेल्या मोबाईल क़्रमाँकावर संपर्क साधून मुलीची माहिती दिली. मुलगी सूखरूप असल्याचे समजताच नातेवाईकाँनी नवरीकड़े धाव घेतली.  पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती लग्नाच्या अर्ध्या तासापूर्वी मंडपात पोहचली. आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र