शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:29 IST

अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात होता.

Ajit Pawar NCP ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत ४ जागा लढवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर यश मिळवता आलं. तसंच बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे. मात्र हा दावा खोडून काढत शरद पवारांच्या पक्षातीलच दोन ते तीन आमदार आमच्यासोबत येणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून पक्षांतराबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या बाष्कळ गप्पा असून या अफवांना काही आधार नाही. त्याउलट गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर शरद पवार गटातील काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असून पावसाळी अधिवेशनापर्यंत शरद पवार गटातीलच दोन ते तीन आमदार हे आमच्यासोबत येणार आहेत," असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी कोणत्या पक्षातील आमदार पक्षांतर करणार आणि कोणाचे आमदार आपल्या नेत्याला ठामपणे साथ देणार, याबाबतचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

जयंत पाटलांनी नेमकं काय म्हटलं आहे? 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षातील संभाव्य इनकमिंगबद्दल काल सूचक वक्तव्य केलं. निवडणूक निकालापासून माझा मोबाईलचा वापर वाढलाय, असं त्यांनी म्हटलं आहे. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १८ ते १९ आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खरंच हे आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत का?" असा प्रश्न पत्रकारांकडून जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले की, "रोहित पवार यांना काही बाहेरचे आमदार संपर्क करत असतील. मात्र या विषयावर मला लगेच काही बोलायचं नाही. या आमदारांबाबत मी योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती देईल. तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही काही करणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस