शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 20:48 IST

'नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो की, ते होते म्हणून आज राम मंदिर तयार झाले, अन्यथा ते झाले नसते.'

Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा झाली. राज्यातील महायुतीच्या या सांगता सभेत पंतप्रधान मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणा विरोधकांवर टीका करण्यासोबतच पंतप्रधान मोदींना पाच मागण्या केल्या.

PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे म्हणाले की, 'पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत, मी त्यांचे स्वागत करतो. 2014-2019 च्या मोदींच्या कार्यकाळाबद्दल जे बोलायचे होते, ते मी 2019 ला बोललो. आता 2019 ते आत्तापर्यंतचे बोलू. बाबरी मशिद पाडली, तेव्हा कारसेवकांना ठार मारण्यात आले. मला वाटले नव्हते की, राम मंदिर बनेल. पण, मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो की, ते होते म्हणून आज राम मंदिर तयार झाले, अन्यथा ते झाले नसते.'

'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू-काश्मीरचा मुद्दा तसाच होता. पण मोदींनी कलम 370 हटवले आणि आज खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर भारताचा भाग झाला आहे. पंतप्रधान मोदींनी देशातून ट्रिपल तलाकसारखा कायदा रद्द केला आणि या देशातील सर्व मुस्लीम महिलांना न्याय मिळून दिला. त्या मुस्लिम महिलांमद्ये समाधानाचे वातावरण तयार झाले. मी या सर्व गोष्टींना सर्वांत धाडसी निर्णय मानतो,' असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान मोदींना पाच मागण्या केल्या.

पंतप्रधान मोदींसमोर राज ठाकरेंनी मांडल्या 'या' मागण्या1. अनेक वर्षांपासून खितपत पडलेला प्रश्न म्हणजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मराठी भाषेला मिळेल अशी अपेक्षा करतो.2. या देशातील शालेय शिक्षणात मुलांना मराठा साम्राज्याचा इतिहासात शिकवला जावा.3. छत्रपतींची खरी स्मारके गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांना पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करण्याकरता आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. 4. गेली 18-19 वर्षे मुंबई गोवा महामार्ग अजूनही तसाच आहे, तो लवकरात लवकर व्हावा.5. या भारतामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या संविधानाला धक्का कुणी लावणार नाही, हे विरोधकांना खडसावून सांगा आणि त्यांची तोंडं एकदाची बंद करा.6. या भारतात अनेक देशभक्त मुसलमान आहेत, जे या देशावर प्रेम करतात. पण, काही मूठभर आहेत, जे उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला पाठिंबा देतात. त्यांना गेल्या 10 वर्षात डोकं काढता आलं नाही. त्यांचे अड्डे तपासून घ्या, तिथं माणसं, सैन्य घुसवून अड्डे नष्ट करा.7. मुंबई रेल्वेकडे लक्ष द्या, त्यासाठी जास्तीत जास्त पैसे द्या, अशा मागण्या राज ठाकरेंनी मोदींना केल्या.

तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबई