शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उद्धव यांनी पुन्हा सिद्ध केले नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:20 IST

पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले.

- यदु जोशीपाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले. पाच वर्षांत सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन्हीही भूमिकेत शिवसेना राहिली आणि त्यांनी विरोधी पक्षांची ‘स्पेस’देखील भरून काढली. मात्र निवडणूक लागताच काळाची गरज ओळखून भूमिका बदलली. उद्धव यांनी ऐनवेळी भूमिका बदलली तरी शिवसैनिक त्यांच्यासोबत राहिले. राज ठाकरेंनी भूमिका बदलून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला गेले पण मनसैनिक त्यांच्यासोबत गेले नाहीत. हा दोन भावांमधील फरक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून लाभलेला राजकीय वारसा टिकवून ठेवणे किंबहुना तो अधिक समृद्ध करणे हे उद्धव यांच्या पुढचे आव्हन होते. मात्र उद्धव यांनी मोदी-शहा-फडणवीसांच्या प्रभावातही शिवसेना टिकवली. शिवसेना फुटणार, शिवसेनेत असंतोष आहे, अशा बातम्या येत असतानाही अत्यंत धिरोदत्तपणे उद्धव यांनी संघटना बांधून ठेवली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडलेले असताना त्यांनी महापालिकेवर भगवा फडकावला. लोकसभा निवडणुकीत युती करताना त्यांनी भाजप नेतृत्वास आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडले. देशात मोदींंची लाट असल्याचे अचूक ओळखत भाजपशी युती करण्याचे मुत्सद्दीपण उद्धव ठाकरे यांनी दाखविले. त्यासाठी यूटर्न घेतला.>भाकरी परतवली नाहीअनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी बदलली असती तर चित्र वेगळे असते. योग्य वेळी भाकरी परतवली नाही. शिवसेनेचे काही जण मोदीलाटेने तरले.भाजपसोबत किती ताणायचे आणि कुठे थांबायचे याचे अचूक भान उद्धव ठाकरे यांनी दाखवत युती केली. २०१४ प्रमाणे याहीवेळी मोदी लाटेचा शिवसेनेला मोठा फायदा झाला.शिवसेना हा भाग्यवान पक्ष आहे. गळ्यात भगवा दुपट्टा टाकून भगवा टिळा लावला अन् जय भवानी-जय शिवाजी म्हटलं की शिवसैनिक चार्जड् होतो. पक्षासाठी पदरचे पैसे खर्च करणाऱ्या शिवसैनिकांचाही हा विजय आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019