शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

अहंकार, अनीतीला मतदारांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:10 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  

- सचिन सावंत(सरचिटणीस, काँग्रेस)लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करावयाचे झाले तर गेल्या दहा वर्षांमध्ये लोकशाही व संविधानावर आवडला गेलेला गळफास आता या निकालामुळे सैल झाला आहे असे म्हणावे लागेल. लोकशाहीला आता मोकळा श्वास घेता येईल.  महाभारतामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण दुर्योधन व दु:शासन करत होते तेव्हा द्रोणाचार्य, भीष्माचार्य तथा सभागृहातील सर्वजण स्वस्थ बसले होते. त्यावेळी जनार्दनाने येऊन द्रौपदीचे लज्जारक्षण केले. गेली दहा वर्षे लोकशाहीचे वस्त्रहरण होत होते आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी होती त्या सर्व संविधानिक संस्था सरकारच्या भाट झाल्या होत्या किंवा आत्मबळ हरवून बसल्या होत्या. अशावेळी लोकशाहीचे रक्षण हे जनता जनार्दनाने केले आहे. 

ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे होती यात शंका नाही. निवडणुकीमध्ये लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या सत्ताधारी व विरोधकांना समान संधीचा मागमूसही नव्हता. दोन मुख्यमंत्री व अनेक नेते जेलमध्ये पाठवले गेले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले किंबहुना चोरण्यात आले. निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे असे म्हणणे धाडसाचे ठरत आहे. भाजपच्या आर्थिक व सत्तेच्या पाशवी बळाविरोधात लढणे सोपे नव्हते.  ही लढाई खरे तर जनतेनेच हाती घेतली आणि भाजपचा देशभर उधळलेला वारू महाराष्ट्राने रोखला. अहंकार, अनीती आणि अत्याचार जनतेला चालत नाही हे या निकालांमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे अधोरेखित झाले, याचे समाधान वाटते. 

     उत्तर मुंबईतील जागा आम्ही मोठ्या फरकाने हरलो याचे दुःख जरूर आहे.      यावेळी भाजपने उमेदवार लवकर घोषित केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला.      महाविकास आघाडीतील जागावाटप अजून लवकर झाले असते आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार लवकर घोषित झाला असता तर लढाई अधिक जोमाने लढता आली असती.      विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर व्हावे ही अपेक्षा आहे.      ही लढाई महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने लढून भाजपला धोबीपछाड दिली याचा आनंद आहे.  

अभूतपूर्व समन्वयलोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्याकरिता काँग्रेसला त्यागाची भूमिका घ्यावी लागली. यामुळे काही नेते पक्ष सोडूनही गेले. परंतु पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे, हा त्यामागे काँग्रेस पक्षाचा उद्देश होता. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांचा एकमेकांशी अभूतपूर्व समन्वय होता हे आवर्जून सांगावे लागेल.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSachin sawantसचिन सावंत