शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: एकनाथ शिंदेंची 'होम पीच'वर जोरदार 'बॅटिंग; ठाकरेंचे शिलेदार 'बॅक फूट'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:33 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यात ठाणे, कल्याण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पुढे असल्याचा कल आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल आता स्पष्ट होत आहे. त्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ठाणे आणि कल्याण मतदारसंघात सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पुढे असल्याचं चित्र आहे. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे नरेश म्हस्के हे सध्या ७० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्याठिकाणी दुसऱ्या नंबरवर राजन विचारे यांना १ लाख ३२ हजार मते पडली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे ७० हजार मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी श्रीकांत शिंदे यांना १ लाख ५४ हजाराहून अधिक मते आहेत तर उबाठा गटाच्या वैशाली दरेकर यांना ८४ हजार मते पडली आहेत. ठाणे आणि कल्याण मतदारसंघ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राऊंड आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० हून अधिक आमदार आणि १२ खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. त्यानंतर ठाणे आणि कल्याण मतदारसंघात कोण उभं राहणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. 

ठाण्यात राजन विचारे हे विद्यमान खासदार होते. ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंनी राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विचारे निवडणुकीत उभे होते. तर महायुतीत ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यात एकनाथ शिंदेंनी त्यांचे विश्वासू असलेले नरेश म्हस्के यांना ठाण्यातून तिकीट दिले. मविआकडून सातत्याने म्हस्के यांचा राजन विचारेंकडून पराभव होईल असं बोललं जात होतं. त्यात नेते जरी शिंदेसोबत गेले असले तरी कार्यकर्ते आणि जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा उबाठा गटाच्या नेत्यांकडून केला जात होता. परंतु ठाण्यात याउलट चित्र दिसत आहे. 

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार होते.  श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कल्याण दौरा केला होता. त्याठिकाणी वैशाली दरेकर यांना उबाठा गटाने तिकीट दिले. श्रीकांत शिंदे यांचा पराभव करणारच असा चंग ठाकरे गटाने बांधला होता. परंतु ठाणे आणि कल्याण मतदारसंघात सध्या तरी शिंदेच्या शिवसेनेची सरशी होताना दिसते.  

टॅग्स :thane-pcठाणेkalyan-pcकल्याणUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल