शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चाैघींचा संघर्ष; दाेघींना संधी, पण ‘पिक्चर अभी बाकी है...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 10:00 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: भावना गवळी, नवनीत राणा, प्रतिभा धानोरकर आणि रश्मी बर्वे या विदर्भातील लोकसभा निवडणूक रणांगणातील रणरागिणी. चौघींचा पक्ष वेगळा, कर्मभूमी वेगळी, पण संघर्ष हा समान दुवा. उमेदवारी मिळवण्याचा चौघींचाही संघर्ष गाजला.

- राजेश शेगाेकारनागपूर - भावना गवळी, नवनीत राणा, प्रतिभा धानोरकर आणि रश्मी बर्वे या विदर्भातील लोकसभा निवडणूक रणांगणातील रणरागिणी. चौघींचा पक्ष वेगळा, कर्मभूमी वेगळी, पण संघर्ष हा समान दुवा. उमेदवारी मिळवण्याचा चौघींचाही संघर्ष गाजला. गवळींना पक्षाने तर बर्वेंना जात प्रमाणपत्राने उमेदवारीपासून दूर ठेवले. राणा व धानोरकर यांनी उमेदवारीची पक्षीय लढाई जिंकली, मात्र चारचौघींचा संघर्ष अजून संपलेला नाही. 

पक्षांतर्गत ऐक्याचे आव्हान संपूर्ण राज्यात काँग्रेसला विजय देणाऱ्या चंद्रपूर या एकमेव मतदारसंघाचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात संघर्ष उभा ठाकला, अखेर धानोरकर यांनी बाजी मारली.तत्पूर्वी आरोप-प्रत्यारोपांची पातळी कौटुंबिक स्तरावर पोहोचल्याने काँग्रेसमधील दोन गटांत दरी रुंदावली. हा दुरावा कमी करतानाच भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

उमेदवारी रद्द झाल्याने आल्या चर्चेत - रश्मी बर्वे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली अन् थेट अध्यक्ष झाल्या. नागपूर जिल्ह्याबाहेर त्यांचे नावही कधी चर्चेत नव्हते. पण रामटेक मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली अन् छाननीच्याच दिवशी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावर त्यांची उमेदवारी बाद झाली. यामुळे बर्वे राज्यभर चर्चेत आल्या.- पक्षांतर्गत विरोध आणि ऐनवेळी आलेला जातप्रमाणपत्राचा मुद्दा यामुळे बर्वे यांच्या अडचणीत भर पडली व त्यांची उमेदवारी रद्द झाली. आता रामटेकमध्ये त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्या त्या स्टार प्रचारक आहेत.

अंतर्गत असंतोषाला कसे जाणार सामोरे?- नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असल्या तरी मुळात सिनेअभिनेत्री असल्याने त्यांची चर्चा देशभर असते. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या भूमिका स्थानिक स्तरावर वादाच्या ठरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये म्हणून अमरावतीमधील भाजप, शिंदेसेना आणि बच्चू कडू यांचा विरोध होता, मात्र हा विरोध भाजपने डावलला. -राणांनी उमेदवारीची पहिली लढाई जिंकली, पाठोपाठ जातप्रमाणपत्राची दुसरी लढाईही जिंकली. पण आता प्रहारचा उमेदवार, शिंदेसेनेसह अडसुळ पिता-पुत्रांची नाराजी, भाजप निष्ठावंतांमधील असंतोष यांचा सामना करत एकसंघ काँग्रेसला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

तिकीट कापले, पुढे काय?यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेत पोहोचण्याचा विक्रम करणाऱ्या भावना गवळी या विदर्भातील एकमेव महिला खासदार. ‘अँटी इन्कम्बसी’ व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपने उमेदवार बदलण्याची शिंदेसेनेला गळ घातली. ती मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली. १ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरून निघतानाच त्यांचा मावळलेला उत्साह उमेदवारी कापली गेल्याचे संकेत देणारा होता. आता त्या कोणती भूमिका निभावतात यावर त्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४amravati-pcअमरावतीchandrapur-pcचंद्रपूरnavneet kaur ranaनवनीत कौर राणाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४