शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

फाळणीनंतर निर्वासितांचे पुनर्वसन करणारे खासदार, देवराव कांबळे यांच्यावर पं. नेहरूंनी सोपविली होती जबाबदारी

By भारत दाढेल | Updated: April 4, 2024 09:59 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या लोकसभेत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची मालिका समोर उभी होती. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नांदेडचे पहिले खासदार देवराव कांबळे यांच्याकडे देण्यात आली होती.

- भारत दाढेलनांदेड - पहिल्या लोकसभेत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची मालिका समोर उभी होती. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नांदेडचे पहिले खासदार देवराव कांबळे यांच्याकडे देण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी रिफ्युजी समितीवर खा. कांबळे यांची नियुक्ती केली होती, अशी आठवण खा. कांबळे यांचे धाकटे बंधू ॲड. मारोतराव कांबळे यांनी सांगितली.  

अडीचशे रुपयांत लढवली होती निवडणूक - सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे शंकरराव टेळकीकरी, तर राखीव जागेवर देवराव कांबळे यांना तिकीट मिळाले. त्यांच्या विरोधात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे विदर्भातील कंत्राटदार गोविंदराव मेश्राम उभे होते.- काँग्रेसचे नेते शंकरराव चव्हाण यांनी अण्णांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यावेळी देवराव कांबळे यांनी खिशात अडीचशे रुपये घेऊन प्रचार केला होता. कधी पायी, तर कधी बैलगाडीने प्रवास करीत मिळेल ते खाऊन त्यांनी प्रचार केला होता. 

स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती शिफारसस्वातंत्र्यानंतर प्रथमच झालेल्या १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हा द्विमतदारसंघ होता. सर्वसाधारण गटातून एक व अनुसूचित जातीमधून एक, असे दोन लोकप्रतिनिधी निवडून येणार होते. काँग्रेसकडून राखीव जागेवर निवडणूक लढविण्यासाठी पाथरी, जि. परभणी येथील देवराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली. मातंग समाजाचे देवराव कांबळे यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ, पुरणमल लाहोटी, बाबासाहेब परांजपे यांच्या शिफारशीमुळे देवराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nanded-pcनांदेडcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४