शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

Maharashtra Lockdown News: गुड न्यूज! आजपासून २१ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल; पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 07:23 IST

Maharashtra Lockdown News: पावसाळी कामांसाठीच्या साहित्याची दुकानेही सुरू

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांत सवलती दिल्या आहेत. त्यानुसार १ जूनपासून २१ जिल्ह्यांत मॉल सोडून आवश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २पर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल, रेस्टारंटही घरपोच सेवेकरिता सुरू राहणार आहेत.२९ मे २०२१च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरण्यात आली आहे.   अकोला व चंद्रपूर जिल्हे रेड झोनमध्येच असल्याने निर्बंध शिथिल होणार नाहीत.  नाशिकला सलून, सराफ दुकाने, दूध विक्री, शासकीय कार्यालये, भाजी विक्री, रेशन दुकाने, बँका, पोस्ट, मुद्रांक कार्यालये निर्बंधासह सुरू राहणार आहेत.१० टक्क्यांवर पॉझिटिव्हिटी जिल्हा         पॉझिटिव्हिटी     ऑक्सिजन          रेट %    बेड %सातारा     २०.९४     ८९.५४ उस्मानाबाद     १८.१६     ६० रत्नागिरी     १७.६९    ६८.२१ सांगली     १७.३५    ४९सिंधुदुर्ग     १७     ६७बीड     १६.१३     ६० औरंगाबाद    १५.०४     ४५परभणी     १४.६१     ३३ रायगड     १४.१०    ४२कोल्हापूर     १३.९    ७६ अकोला     ११.७४    ७०मुंबई     ११.२७    ३५चंद्रपूर     १०.८६    ५५पुणे     १०.८    ३५१० टक्क्यांखाली पॉझिटिव्हिटी जिल्हा         पॉझिटिव्हिटी     ऑक्सिजन          रेट %    बेड %वर्धा     ८.५२    १५गोंदिया     ८.५    ०३अहमदनगर     ८.४६     ५०सोलापूर     ८.३५     ५१.२२ नाशिक     ८.२१     २१.८१ठाणे     ७.८५    १५भंडारा     ७.७     १८.८० बुलडाणा     ७.२३    ५०हिंगोली     ७.२०     २८.५० गडचिरोली     ६.६२    १२.५४पालघर     १६.७८    - अमरावती     ५.४४     ४३नागपूर     ५.६    २०जालना     ५.२६    ३०लातूर     ४.५     ४०नंदुरबार     ४.८    ४०नांदेड     ४.५०     ५६.८३वाशिम     ४.२     १५यवतमाळ     ३.५०    ४०जळगाव     २.८६     २१ धुळे     २.८१     १८नाशिकला सलून, सराफ दुकाने सुरूनाशिकला सलून, सराफ दुकाने, कृषिविषयक आस्थापना, दूध विक्री, शासकीय कार्यालये, भाजी विक्री, रेशन दुकाने, बँका, पोस्ट, मुद्रांक कार्यालये निर्बंधासह सुरू राहणार आहेत.विदर्भातील १० जिल्ह्यांत सवलतीअत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू व शनिवार व रविवार पूर्णत: बंद. मराठवाड्यालाही  मिळाला दिलासा जालना जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. हिंगोलीत शनिवार-रविवार वगळून इतर दिवशी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पुण्यात जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकानांना दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.मॉल सोडून आवश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू अकोला व चंद्रपूर जिल्हे रेड झोनमध्येच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या