How to get E-Pass: जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आता ई-पास गरजेचा; जाणून घ्या कसा मिळवायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 03:35 PM2021-04-23T15:35:47+5:302021-04-23T15:37:09+5:30

How to get E-Pass know the process: ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले निर्बंध वाढले; जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई-पास गरजेचा

maharashtra lockdown e pass how to apply online for e pass know all the process | How to get E-Pass: जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आता ई-पास गरजेचा; जाणून घ्या कसा मिळवायचा

How to get E-Pass: जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आता ई-पास गरजेचा; जाणून घ्या कसा मिळवायचा

Next

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. सरकारनं 'ब्रेक दि चेन'अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर केले आहेत. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना ई पास आवश्यक असेल. रितसर अर्ज करून ई-पास मिळवता येईल. काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे. 

कसा मिळवायचा ई- पास? 
- ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. 
- त्यानंतर 'apply for pass here'  पर्याय निवडा.  
- पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा. 
- आवश्यक कागदपत्र इथं जोडा. 
- प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं. 
- कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन ती फाईल अपलोड करावी. 
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. म्हणजेच तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल. 
- पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तोच टोकन आयडी वापरुन तुम्ही ई- पास डाऊनलोड करु शकता. 
- या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल. 
- प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो. 

ई- पासबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे-
- अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
- अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची गरज नाही. 
- कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो. 
- ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. 
 

Web Title: maharashtra lockdown e pass how to apply online for e pass know all the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.