शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

विधिमंडळात प्रचंड गदारोळ; दिवसभराचे कामकाज गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 03:46 IST

कर्जमाफी, महिला अत्याचारावरून विरोधक आक्रमक

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लागोपाठ दुसऱ्या दिवशी संतप्त विरोधी पक्ष सदस्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचारांसंदर्भात प्रचंड गदारोळ घातला. जोरदार घोषणाबाजीत कामकाज गुंडाळण्यात आले.विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बाकीचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या दोन मुद्यांवर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्ष नाना पटोले यांनी ती अमान्य केली. हे विषय गंभीर आहेतच पण बाकीचेही कामकाज आहे आणि शिवाय आजच्या कामकाजात महिलांवरील अत्याचारांसंदर्भात लक्षवेधी सूचनाही आहे, असे पटोले म्हणाले पण संतप्त विरोधी पक्ष सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.भाजपच्या महिला सदस्यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे लिहिलेले कापडी फलक गळ्यात बांधले होते. या सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणा देत होत्या. विरोधी सदस्यांनी बोंबा मारणे सुरू केले. सरकारने कर्जमाफी योजनेत १५ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. या गतीने कर्जमाफी देणार असतील तर ४६० महिने लागतील. पहिल्या यादीत बुलडाणा जिल्ह्यातील साखळी या दहा हजार लोकवस्तीच्या गावातील १८२१ शेतकºयांपैकी १९३ जणांनाच पहिल्या यादीत कर्जमाफी दिली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी काय करणार, एकरी २५ हजार रुपये अतिवृष्टीग्रस्तांना देण्याच्या घोषणेचे काय झाले अन् महिला अत्याचार रोखण्यासाठी आताच्या आता चर्चा सुरू करा, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न आज अतिशय गंभीर आहे.हिंगणघाटची घटना तर राज्याचे समाजमन सुन्न करणारी आहे. असे फडणवीस म्हणाले. विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. काहीसदस्य वेलमध्ये बसले. गदारोळात कामकाज सुरुवातीला दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या गदारोळात ग्राम पंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्यासंबंधीचे विधेयक मात्र सरकारने आवाजी मतदानाने मंजूर करवून घेतले.विधान परिषदेत दुसºया दिवशीही गोंधळयाच मुद्यांवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधान परिषदेतील कामकाज दुसºया दिवशीही गदारोळातच वाहून गेले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेटाळला पण त्यांना बोलण्याची अनुमती दिली. दरेकर यांनी सरकारवर आरोपांची सरबत्ती केली. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला.आक्रमक झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजीला सुरुवात केली. या गोंधळातच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला.पहिला प्रश्न रवींद्र फाटक यांनी उपस्थित केला. त्याला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिल्याने सभापतींनी पहिल्यांदा ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतरही चर्चेच्या मागणीवर ठाम राहत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२० मांडले आणि सरकारतर्फे मंजूर करण्यात आले.विधान परिषदेतील प्रश्नोत्तरेकेळकर समितीचा अहवाल बासनातराज्याच्या मागास भागातल्या अनुशेष भरून काढण्याबाबत नेमण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीबाबत शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या समितीने आठ आॅक्टोबर २०१३ रोजी शासनाला अहवाल सादर केला होता. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लेखी उत्तरात सांगितले.जलसिंचन प्रकल्प नियमितचमागच्या सरकारच्या काळात जलसंपदा विभागाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तास मान्यता मिळण्याआधीच नियमबाह्य पद्धतीने सुमारे ६१४६ कोटी रूपयांच्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले. यांनी शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी हा प्रश्न उपस्थित केला.ग्रामसडक योजनेत गैरव्यवहार?पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणाºया रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विजय तथा भाई गिरकर, प्रवीण दरेकर आदींनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय मंडळराज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय जारी करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विलास पोतनीस यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले...तर तिसºया अपत्यासाठी बाळंतपणाची रजाशासकीय व निमशासकीय सेवेतल्या महिला कर्मचाºयांना पहिल्या दोन अपत्यांच्या बाळंतपणासाठी सहा महिन्यांची रजा देण्यात येते. दुसºया बाळंतपणात मूल दगावल्यास ती रजा तिसºया बाळंतपणासाठी देण्यात येते असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनायक मेटे यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे