शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद; सीमावाद पुन्हा उफाळला, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:47 IST

बेळगावात शुक्रवारी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या मराठी अक्षरातील क्रमांकपट्टीला काळे फासले. शिवसेनेच्या ॲम्ब्युलन्सवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला.

कोल्हापूर/बेळगाव : बेळगावात शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर व ॲम्ब्युलन्सवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, मराठी फलकांना काळे फासण्याचे आंदोलन आणि त्यानंतर कोल्हापुरात एसटीवर झालेली दगडफेक, शिवसैनिकांनी कर्नाटकच्या वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून केलेले आंदोलन, यामुळे सीमावाद पुन्हा उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांचे शनिवारी हाल झाले. बेळगावात शुक्रवारी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या मराठी अक्षरातील क्रमांकपट्टीला काळे फासले. शिवसेनेच्या ॲम्ब्युलन्सवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. यानंतर,  बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील काकती येथील गावाजवळचे काही मराठी फलकही कन्नड कार्यकर्त्यांनी फोडले. कन्नड   कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीनंतर शिवसैनिक व मराठी भाषिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.    या  तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी फलाटावर लावलेल्या कोल्हापूर-स्वारगेट-पुणे या बसवर कर्नाटकातील एकाने दगडफेक केली. याप्रकरणी एकनाथ सोमाण्णा हलगीकर यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला. शिवसैनिकांनी कर्नाटकच्या वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेकोल्हापूर शिवसेनेने शनिवारी कागल येथील तपासणीनाक्यावर कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांवर जय महाराष्ट्र असे फलक चिकटवले. तसेच या नाक्यावरून कर्नाटक पासिंगची वाहने सोडू नयेत, त्यांना परत कर्नाटकात पाठवावे, असे निवेदनही कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टिव्हन अल्वारीस यांना दिले. तोपर्यंत बससेवा बंदआंदोलनावेळी दोन्ही राज्यांच्या बसला आंदोलक टार्गेट करून त्या फोडतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगाराने जोपर्यंत वाद निवळत नाही, तोपर्यंत कर्नाटकात बससेवा सुरू करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.

‘प्रकाश शिरोळकर यांना संरक्षण द्या’  शिरोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची  शिवसेनेने गंभीर दखल घेतली आहे. शिरोळकर यांना केंद्रीय पथकामार्फत संरक्षण द्यावे, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका - संजय राऊतबेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल, तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :belgaonबेळगावMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकShiv Senaशिवसेना