शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
3
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
4
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
5
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
6
तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
7
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
8
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
9
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे युनिक नाव
10
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
11
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
14
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
15
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
16
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
17
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
18
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
19
Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!
20
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बनतोय भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे हब; एमबीबीएस जागांमध्ये राज्याचा १० टक्के वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:39 IST

वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८०, तर एमबीबीएसच्या जागा ११,८४६

हरीश गुप्तानवी दिल्ली - वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे. राज्यातील एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८० आणि एमबीबीएसच्या जागांची संख्या ११,८४६ पर्यंत पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात ८५ वैद्यकीय महाविद्यालये असून, एमबीबीएसच्या १२,४७५ जागा आहेत. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२०-२१ पासून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत ३९.७८ टक्के वाढ झाली आहे. महाविद्यालयांची संख्या ५५८ वरून ७८० वर गेली आहे. त्याचबरोबर एमबीबीएसच्या जागांमध्ये ४१.९३ टक्के वाढ झाली आहे. या जागा ८३,२७५ वरून १,१८,१९० वर गेल्या आहेत. देशातील सर्वाधिक रुग्णभार असलेल्या राज्यांपैकी एक म्हणून ही दरी भरून काढणे महत्त्वाचे मानले जात आहे.

आरोग्य सेवेच्या व्यवस्थेला बळकटी

वैद्यकीय महाविद्यालये आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे एकूणच आरोग्य सेवेच्या व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. या विस्ताराला चालना देणाऱ्या प्रमुख केंद्रीय योजनांमध्ये विद्यमान जिल्हा व संदर्भ रुग्णालयांशी संलग्न १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देणे समाविष्ट आहे. त्यापैकी १३१ देशभरात आधीच कार्यरत आहेत. यामुळे ८३ महाविद्यालयांत एमबीबीएसच्या ४,९७७ जागा वाढल्या आहेत. 

एमबीबीएस जागांमध्ये राज्याचा १० टक्के वाटा

नवीन आणि अपग्रेड केलेल्या महाविद्यालयांमध्ये  प्राध्यापकांच्या कमतरतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्राने अध्यापन पदांसाठी डीएनबी पात्रतेला परवानगी दिली आहे आणि वैद्यकीय प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय ७० वर्षे केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या एमबीबीएसच्या ११,८४६ जागांसोबत महाराष्ट्राचा वाटा देशातील एकूण पदवीपूर्व वैद्यकीय क्षमतेच्या १० टक्के झाला आहे. आगामी काही वर्षांत दरवर्षी हजारो डॉक्टर तयार करण्याची हमी देणारी ही महत्त्वाची झेप असेल. 

देशात नवीन २२ एम्स...

अलीकडील कागदपत्रांवरून दिसून येते की, पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत (पीएमएसएसवाय) ७५ सुपर स्पेशालिटी ब्लॉक्सना मंजुरी देण्यात आली आहे. ७१ प्रकल्प आधीच पूर्ण झाले आहेत. तर देशात नवीन २२ एम्स मंजूर करण्यात आले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Emerging as India's Medical Education Hub: 10% MBBS Share

Web Summary : Maharashtra is becoming a medical education hub, boasting 80 medical colleges and 11,846 MBBS seats, representing 10% of India's capacity. Central schemes boost infrastructure, addressing faculty shortages and increasing MBBS seats nationwide, strengthening healthcare.
टॅग्स :Medicalवैद्यकीय