शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

महाराष्ट्रात घातपाताचा इसिसचा डाव उधळला!

By admin | Updated: July 15, 2016 03:46 IST

आखाती राष्ट्रांसह अमेरिका, फ्रान्सलाही घातपाती कारवायाने हादरून सोडणाऱ्या ‘इसिस’ने महाराष्ट्रातही मोठा घातपात करण्याचा रचलेला डाव एटीएसने उधळून लावला.

इंटरनेटद्वारे होता म्होरक्यांशी संपर्कऔरंगाबाद/परभणी/मुंबई : आखाती राष्ट्रांसह अमेरिका, फ्रान्सलाही घातपाती कारवायाने हादरून सोडणाऱ्या ‘इसिस’ने महाराष्ट्रातही मोठा घातपात करण्याचा रचलेला डाव औरंगाबाद आणि नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उधळून लावला. घातपात घडविण्यासाठी स्फोटकांची जुळवाजुळव करणारा इसिसचा एजंट नासेरबीन अबुबकर याफई उर्फ चाऊस (३१, परभणी) याला बुधवारी रात्री परभणीतून अटक करण्यात आली. अटकेनंतर नासेरबीनला एटीएसने औरंगाबादेतील विशेष न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने त्याला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईबाबत एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नासेरबीन हा इसिसचा समर्थक असून, त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती खबऱ्याकडून काही दिवसांपूर्वी नांदेड एटीएसचे निरीक्षक माणिक बेंद्रे यांना मिळाली होती. तेव्हापासून औरंगाबाद आणि नांदेडचे एटीएस पथक नासेरच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. नासेर हा इसिसचा कट्टर समर्थक असल्याने, तो इंटरनेटद्वारे इराक, सीरिया या देशांतील इसिसच्या म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचे पुरावे हाती लागताच, एटीएसने त्याला परभणीतील देशमुख गल्ली, गाडीवान मोहल्ला येथून बुधवारी रात्री अटक केली. (लोकमत न्यूजनेटवर्क)परभणीचा नासेर सीरियातील कमांडरच्या संपर्कातनासेरबीन हा सीरियातील ‘इसिस’चा कमांडर असलेल्या फारुकच्या संपर्कात होता, असे तपासात समोर आले आहे. फारुकसोबत नासेरने अनेकदा टिष्ट्वटर, टेलिग्राम, स्काइप, चॅटसेक्युर अशा इंटरनेट मॅसेंजर अ‍ॅपवर चॅटिंग केली होती. चॅटिंगमध्ये त्याने इसिसमध्ये भरती होण्याबाबत चर्चा केल्याचे उघडकीस आले. फारुकने त्याला पिस्टल पुरविण्याचेही आश्वासन दिलेले होते, लवकरच ते त्याला मिळणार होते. उच्च विद्याविभूषित नासेर : आरोपी नासेर हा उच्च विद्याविभूषित आहे. त्याने पुण्यातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविलेली आहे. परभणीत तो अधूनमधून कंत्राटदारीही करीत होता. परभणीत ग्रँड कॉर्नर भागात त्याच्या वडिलांचे हॉटेल आहे. या हॉटेलवरही तो बसत होता.नासेर औरंगाबाद एटीएसच्या ताब्यात; मुंबईत गुन्हा दाखल तपासाअंती आरोपी नासेरबीन हा इसिसचा समर्थक असल्याचे आणि इसिसचा सीरियातील कमांडर फारुकच्या मदतीने राज्यात मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नासेरबरोबरच इसिसचा कमांडर फारुकविरुद्धही मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या नासेर औरंगाबाद एटीएसच्या ताब्यात असून, त्याच्या संपर्कात कोण-कोण होते, याची पोलीस माहिती काढत आहेत.मोठा घातपात घडविण्याची तयारीइसिसने नासेरच्या माध्यमातून राज्यात मोठा घातपात घडविण्याची तयारी सुरू केली होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यासाठी नासेरला तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पवित्र रमजानच्या महिन्यातच घातपात घडविण्याचा डाव रचण्यात आला होता, परंतु काही तयारी पूर्ण न झाल्याने तो मुहूर्त टाळला, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. इसिसने पाठविले होते बॉम्ब बनविण्याचे ‘डायग्राम’नासेरबीनला सीरियावरून कमांडर फारुकने स्फोट घडविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व बॉम्ब कसा बनवायचा, याचे डायग्राम पाठविले होते, तेही ‘एटीएस’ च्या हाती लागले आहेत. नासेरने स्फोट घडविण्यासाठी साहित्याची जुळवाजुळवही सुरू केलेली होती, असे तपासात समोर आले आहे. एटीएसने त्याच्या घरातून मोबाइल, लॅपटॉप संगणक व काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याच्याही तो प्रयत्नात होता, असे सूत्रांनी सांगितले. राज्यात मोठा घातपात घडवायचा आणि नंतर सीरियाला पळून जाण्याची योजना नासेरने आखली होती. त्यासाठी त्याने आपल्या पासपोर्टचे नुकतेच नूतनीकरणही करून ठेवले होते.