शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC result 2018 : बारावीचा टक्का घसरला, ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण... इथे पाहा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 11:44 IST

मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट

पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली.

विभागनिहाय टक्केवारीचा विचार केल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. कोकणचा निकाल 94.85 टक्के इतका लागलाय. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय. नाशिकचा निकाल 86.13 टक्के इतका लागला आहे. पदवीच्या दृष्टीनं महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी मुलांना मागे टाकलंय. उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी 92.36 इतकी असून 85.23 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.78 टक्के इतकी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १२ जून रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल.विभागनिहाय टक्केवारी- कोकण - ९४.८५पुणे - ८९.५८नागपूर - ८७.५७औरंगाबाद - ८८.७४मुंबई - ८७.४४कोल्हापूर - ९१.००अमरावती - ८८.०८नाशिक - ८६.१३लातूर - ८८.३१

शाखानिहाय निकाल- विज्ञान - ९५.८५कला - ७८.९३वाणिज्य - ८९.५०व्यवसाय अभ्यासक्रम - ८८.४१

कुठे पाहाल निकाल?http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

1. www.mahresult.nic.in2. www.result.mkcl.org3. www.maharashtraeducation.com4. www.rediff.com/exams5. http://maharashtra12.jagranjosh.com 

कसा पाहाल निकाल? 

बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Nashikनाशिकexamपरीक्षा