शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यातील आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेता येईल; अजित पवारांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 20:26 IST

९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेशाच्या धर्तीवरच महाराष्ट्रानं देखील ओबीसीचा डेटा गोळा केला आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित अहवाल मान्य केला पाहिजे. सदर अहवाल मान्य झाला तर राज्यातील निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणासह राबवली जाऊ शकते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 

९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आल्या आहेत. वास्तवीक ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह घ्यायला हवी, अशी आमची भूमिका आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाबाबतचा अहवाल बांठिया समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून १२ जुलैला यावर सुनावणी होणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.  

उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवास शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. असं आम्हाला वाटतं. उद्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहुयात. मी काही वकिलांना विचारले, १६ लोकांचा निकाल वेगळा लागला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितली आहे. 

दरम्यान,  राज्यात काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबतच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार