शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात या, प्रकल्पासाठी सवलतीत जागा घ्या; रामदेवबाबांना फडणवीस सरकारची 'स्पेशल' ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:09 IST

'भेल'चा राखीव भूखंड पतंजलीला देण्याचा प्रयत्न

मुंबई/लातूर: सोयाबीन प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी फडणवीस सरकारनं लातूरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्यापतंजली समूहाला जमीन देऊ केली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा काही भाग पतंजलीला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारनं पतंजली समूहाला मुद्रांक शुल्कमाफीदेखील देऊ केली आहे, असं वृत्त पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लातूरच्या औसामध्ये पतंजलीनं सोयाबीन प्रक्रिया केंद्र सुरू करावं यासाठी फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी २६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांना पत्रदेखील लिहिलं. औसा भागात एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम) प्रकल्प सुरू करण्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी पत्रातून दिलं. 'एमएसएमई प्रकल्पासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्कातून १०० टक्के सूट देण्यात येईल. याशिवाय वीजेच्या दरातही ठराविक कालावधीसाठी सवलत दिली जाईल. वीजेच्या एका युनिटमागे एक रुपयांची सूट देण्यात येईल,' असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. औसामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. यातील ४०० एकर जागा पतंजलीला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असताना त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी भूखंड राखीव ठेवला. मात्र एक दशक उलटून गेल्यानंतरही या जागेवर प्रकल्प सुरू झालाच नाही. औसा भागात पतंजली नेमकं कोणतं केंद्र सुरू करणार आहे, याची माहिती उपलब्ध नसल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या भागात सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प सुरू होईल, अशी शक्यता या अधिकाऱ्यानं वर्तवली. जिल्ह्यात दोन सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प केंद्रं असल्यानं पतंजलीदेखील अशाच प्रकारचा प्रकल्प सुरू करेल, असा अंदाज अधिकाऱ्यानं व्यक्त केला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBaba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली