महाराष्ट्रामध्ये येणार तब्बल १६ हजार कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:32 AM2020-06-16T05:32:24+5:302020-06-16T06:40:09+5:30

बारा देशांतील उद्योगपतींशी केले करार

Maharashtra government signs Rs 16000 crore investment pacts with 12 firms | महाराष्ट्रामध्ये येणार तब्बल १६ हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रामध्ये येणार तब्बल १६ हजार कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्योग विभागातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० (भाग दोन) चा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार ऑनलाइन उपस्थित होते.

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांशी  १६ हजार ३० कोटींचे सामंजस्य करार यात झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. वर्ल्ड असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या.

४० हजार हेक्टर जमीन राखीव
उद्योगांसाठी राज्यात सुमारे ४० हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. विविध परवान्यांऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाईल आणि औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली

या कंपन्यांची गंतुवणूक
एक्सॉन मोबिल (अमेरिका) ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड : ७६० कोटी, हेंगली (चीन) इंजिनिअरिंग - तळेगाव टप्पा क्रमांक-२, पुणे : २५० कोटी आणि १५० रोजगार, असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक - चाकण, तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे : ५६० कोटी, वरूण बेवरेजेस (भारत) अन्न प्रक्रिया - सुपा, अहमदनगर : ८२० कोटी, हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक - भिवंडी- चाकण तळेगाव : १५० कोटी आणि २५०० रोजगार, असेट्ज (सिंगापूर) डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे : ११०० कोटी व २०० रोजगार, इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन - रांजणगाव, पुणे : १२० कोटी आणि ११०० रोजगार, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन जेव्ही विथ फोटोन (चीन) आॅटो-तळेगाव : १००० कोटी रोजगार १५००, इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड : १५०० कोटी आणि रोजगार २५००, रॅकबँक (सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजवडी, पुणे : १५०० कोटी, यूपीएल (भारत) केमिकल - शहापूर, रायगड : ५००० कोटी आणि रोजगार ३००० कोटी, ग्रेट वॉल मोटर्स (चीन) आॅटोमोबाइल तळेगाव- पुणे : ३७७० कोटी आणि २०४२ रोजगार
 

Web Title: Maharashtra government signs Rs 16000 crore investment pacts with 12 firms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.