शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:41 IST

उद्धव काय बोलणार याबाबत उत्सुकता; मुुंबईबाहेर एकाच ठिकाणी ठेवले जाणार

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांची बैठक शुक्रवारी सकाळी मातोश्रीवर होणार असून तीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार या बाबत प्रचंड उत्सुकता आहे.आमदारांना पाचसहा दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीने या असे आदेश शिवसेनाभवनातून देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आमदारांना मुंबईबाहेर एकत्रितपणे जयपूर येथे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये ठेवले जाईल. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी कुठला किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे याची माहिती उद्धव उद्याच्या बैठकीत आमदारांना देतील, असे म्हटले जाते. कारण हिंदुत्वासह विविध मुद्यांवर शिवसेनेला नमते घ्यावे लागले असल्याची बाहेर चर्चा आहे.आमदार पुन्हा एकत्रितविधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आणि शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत एकत्रित ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली.येत्या आठवड्यात महाशिवआघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नक्कीच स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना आमदारांना पुन्हा एकत्रित ठेवले जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना