शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

President Rule : राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 18:21 IST

President Rule In Maharashtra : सत्तेचा तिढा कायम असल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई : शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करायची नाही, अशी भाजपानं घेतलेली भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यात शिवसेनेला आलेलं अपयश यामुळे सत्तासंघर्षाचा पेच निकालानंतर जवळपास तीन आठवडे होत आले तरी कायम राहिला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील चार पक्ष सत्ता स्थापनेसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत होते. बैठका, गाठीभेठींचं सत्र सुरू होतं. मात्र कोणालाही सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र बहुमताचा आकडा गाठिशी नसल्यानं सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचं भाजपानं जाहीर केलं. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्यात आलं. मात्र त्यांनाही बहुमताची जुळवाजुळव करता आलं नाही. राष्ट्रवादीलादेखील बहुमताचा दावा करता आला नाही. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट केव्हा, कशी?राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालत नसल्याची किंवा तसा चालवणं अशक्य असल्याची राष्ट्रपतींची खात्री होणं हा यासाठी मुख्य निकष आहे. नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर ज्याला बहुमताचा पाठिंबा आहे, असं लोकनियुक्त सरकार अधिकारावर आणणं ही राज्यपालांची संवैधानिक जबाबदारी आहे. कोणत्याही कारणानं नवं सरकार स्थापन होऊ न शकणं हे राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालवता न येण्याचंच द्योतक ठरतं.अशा वेळी राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत नवं सरकार स्थापन होईपर्यंत आधीच्या विधानसभेतील बहुमताच्या आधारे सत्तेवर आलेलं सरकार मुदत संपल्यानंतर सत्तेवर राहू शकत नाही. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPresident Ruleराष्ट्रपती राजवट