शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 10:45 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला. आता महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. पण या सर्व घडामोडीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. फडणवीसांना शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्यानं राज्यपालांवर टीकाही झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्यांची उचलबांगडी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या कलराज मिश्र यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आणण्याची अटकळ बांधली जात आहे. राज्यातली सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपानं प्रतिमा संवर्धनासाठी हा खटाटोप चालवल्याचीही चर्चा आहे. मोदी सरकार लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.  फडणवीसांना शनिवारी 23 रोजी सकाळीच राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, तसेच अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सगळ्याच प्रकारावर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पहाटेच राष्ट्रपती राजवट हटवून फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यानं राज्यपालांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती, परंतु न्यायालयानं त्यांची पाठराखण केली होती. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांनी कोणत्याही अधिकारांचं अतिक्रमण केलेलं नसल्याचं म्हटलं होतं. तसेच राज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्यासही न्यायालयानं नकार दिला होता.  

भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून, त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या माध्यमातून केली जाते. भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून, भाजपाच्या वरिष्ठ नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली होती. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस