शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेनेकडून संजय राऊतांचा वापर: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 15:54 IST

शिवसेनेची दिशाभूल करून त्यांना बरबाद करण्याचे काम राऊत हे करत असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.

मुंबई : भाजपानं शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांना गळाला लावून भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं, त्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली. मात्र त्यांनतर भाजप -शिवसेना नेत्यांमधील वाद अधिकच वाढला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. तर संजय राऊतांचा शिवसनेने आजपर्यंत फक्त वापर करून घेतला असल्याचा खोचक टोला नारायणे राणेंनी राऊत यांना लगावला आहे.

महाविकासआघाडीला राज्यपालांनी बोलवले होते. मग त्यांनी आपले बहुमत सिद्ध का केले नाहीत. आता आम्ही सरकार स्थापन केले असून 30 तारखेला बहुमत सुद्धा सिद्ध करू, असे राणे म्हणाले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना आमच्याकडे बहुमतापेक्षा जास्त आमदार असल्याचे दावा करत आहे. मात्र त्यांना त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे आतापर्यंत पाच वेळा आमदारांचे ठिकाण बदलण्यात आले असल्याचा आरोप राणे यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. संजय राऊत यांचे माझ्यासमोर नाव घेत जाऊ नका. संजय राऊत हे कोण आहेत. एक महिन्यापासून ते बडबड करत असताना सुद्धा काहीच झालंं नाही. त्यांना कुणीच विचारत नसल्याचे राणे म्हणाले. तर शिवसनेचे लोकं राऊत यांचे वापर करत आहे. तसेच शिवसेनेची दिशाभूल करून त्यांना बरबाद करण्याचे काम राऊत हे करत असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.

तर गेल्या चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्राच्या राजकरणात सक्रीय असून, सर्वच पक्षातील आमदार माझ्या संपर्कात आहे. माझी सर्वांशी चांगली ओळख असून आमचे मैत्रीचे संबंध असल्याचे राणे म्हणाले. शिवसेनेत मी 39 वर्षे काढली आहे, त्यामुळे सेनेचे सर्वच आमदार माझ्या ओळखीचे असल्याचे ते म्हणाले. तसेच मी भाजपमध्ये असल्याने माझी जवाबदारी आहे की, आमच्या पक्षाचे सरकार स्थापन करावे. त्यामुळे त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे राणे म्हणाले.