शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'अब की बार, देवेंद्र फडणवीस पर वार'; सरकार पडताच खडसेंनी सोडला पहिला 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:10 IST

देवेंद्र सरकार पडताच खडसेंचा 'राग'; भाजपाला घरचा आहेर

मुंबई: देवेंद्र सरकार-२ कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर २५ जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकीट कापल्यानं, त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. माझ्यासह विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट देण्यात आलं नाही. मात्र किमान आम्हाला सक्रीय केलं असतं, तरी पक्षाच्या २५ जागा वाढल्या असत्या, असं खडसे म्हणाले. पक्ष चुकत नसतो. ज्यांच्याकडे धुरा दिली जाते, त्यांचे निर्णय चुकत असतात, असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बहुमताची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्यानं भाजपा सरकार कोसळलं. मला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मी पक्षासाठी ४२ वर्षे तपश्चर्या केली. पक्ष वाढावा यासाठी मेहनत घेतली. पण पक्षाच्या विस्तारासाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांनाच बाजूला करण्यात आलं, अशा शब्दांत खडसेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्यावर भाष्य केलं. सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे आम्ही त्याचवेळी रद्दीत विकले. कारण त्यावेळी रद्दीला चांगला भाव होता, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना सोबत घेणाऱ्या भाजपाच्या भूमिकेवर सूचक प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसेVinod Tawdeविनोद तावडेPrakash Mehtaप्रकाश मेहताChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे