शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
3
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
4
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
5
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
6
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
7
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
8
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
9
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
10
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
11
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
12
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
13
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
14
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
15
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
16
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
17
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
18
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
19
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
20
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:35 IST

Shiv Chhatrapati Sports Awards List: येत्या शुक्रवारी ८९ पुरस्कार विजेत्यांचा राज्याच्या क्रिडा विभागाकडून सन्मान केला जाणार आहे.

राज्याच्या क्रीडा विभागाकडून बुधवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना २०२३-२४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. यासह एकूण ८९ खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, ज्यात भारताचे क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांच्याही नावाचा समावेश आहे. येत्या १८ एप्रिल रोजी राज्याच्या क्रीडा विभागाकडून पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जाणार आहे.

मुंबईत बुधवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासह, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अशा एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

२०२३-२४ पुरस्कार्थींची यादी: शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार – शकुंतला खटावकर (पुणे). उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक : जिम्नॅस्टिक्स - प्रवीण ढगे (पुणे). कुस्ती - गोविंद पवार (पुणे), शिवशंकर भावले (लातूर). खो-खो - प्रवीण बागल (धाराशिव). दिव्यांग मार्गदर्शक – मानसिंग पाटील (कोल्हापूर, पॅरा जलतरण). थेट पुरस्कार – गणेश देवरुखकर (मुंबई उपनगर). जिजामाता पुरस्कार – रचना धोपेश्वर (पुणे, पॅरा ज्युदो).

खेळाडू (थेट पुरस्कार):

तिरंदाजी- अदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), प्रथमेश जवकार (बुलढाणा), 

ॲथलेटिक्स- ऐश्वर्या मिश्रा (मुंबई उपनगर), यमुना आत्माराम (पुणे), किरण भोसले (कोल्हापूर).

बॅडमिंटन- चिराग शेट्टी (मुंबई उपनगर), अक्षया वारंग (मुंबई शहर).

क्रिकेट- जेमिमा रॉड्रिग्ज (मुंबई शहर), देविका वैद्य (पुणे), राहुल त्रिपाठी (पुणे), ऋतुराज गायकवाड (पुणे), शिवम दुबे (मुंबई उपनगर), जितेश शर्मा (अमरावती), यशस्वी जयस्वाल (मुंबई शहर). 

अश्वारोहण- हृदय छेडा (मुंबई उपनगर).

हॉकी- वैष्णवी फाळके (सातारा).

कबड्डी- अस्लम इनामदार (अहिल्यानगर), आकाश शिंदे (नाशिक).

रोइंग- धनंजय पांडे (रायगड). 

नेमबाजी-  किरण जाधव (सातारा).

जलतरण वॉटरपोलो- सांजली वानखेडे (अमरावती), उदय उत्तेकर (ठाणे).

तिरंदाजी- मंजिरी अलोणे (अमरावती), यशदीप भोगे (अमरावती). 

बॉक्सिंग- अजय पेंडोर (नांदेड).

तलवारबाजी- श्रुती जोशी (नागपूर), धनंजय जाधव (सांगली).

कॅनोइंग व कयाकिंग- अंकुश पोवटे (सांगली). 

सायकलिंग- ऋतिका गायकवाड (नाशिक), मयूर पवार (सातारा). 

जिम्नॅस्टिक्स (आर्टिस्टिक्स)- ईशिता रेवाळे (मुंबई उपनगर). 

रिदमिक जिम्नॅस्टिक्स- संयुक्ता काळे (ठाणे). 

जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन– राही पाखले (ठाणे), आदर्श भोईर (ठाणे).

ज्युदो- श्रद्धा चोपडे (छत्रपती संभाजीनगर).

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई