शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

नक्षलवादाचे नियंत्रण महाराष्ट्राला जमले, छत्तीसगडला का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 9:35 AM

Naxal movement in Maharashtra: राज्यात नक्षल्यांविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात येत असली तरी छत्तीसगड राज्यात वाढलेला या चळवळीचा जोर महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरत आहे.

- मनोज ताजनेगडचिरोली : गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर धुमाकूळ घालणाऱ्या नक्षल चळवळीला आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे. राज्यात नक्षल्यांविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात येत असली तरी छत्तीसगड राज्यात वाढलेला या चळवळीचा जोर महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी जे महाराष्ट्राला जमले ते छत्तीसगडला का नाही? असा प्रश्न उपस्थित केला  जात आहे.दोन दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना संपवल्यानंतर गृहमंत्री दिलीप  वळसे पाटील यांनी गडचिरोलीला धावती भेट देऊन पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.  नक्षलवाद नियंत्रणासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड पोलिसांमध्ये समन्वय साधण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. छत्तीसगडच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जोपर्यंत नक्षलवादी सक्रिय आहेत तोपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीतील गडचिरोली किंवा गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या कुरापती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद नियंत्रणात आणणे महाराष्ट्राच्या गृहविभागाला महत्त्वाचे वाटते. 

सी-६० पथकामुळे वाढले यशमहाराष्ट्राच्या गृहविभागाने नक्षलविरोधी लढ्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे विशेष प्रशिक्षित कमांडो पथक (सी-६०) तयार केले. विशेष म्हणजे यात स्थानिक लोकांचा समावेश असल्याने त्यांना नागरिकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधता येतो. छत्तीसगडमध्ये मात्र नक्षलविरोधी अभियान केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरवशावर राबविले जात असल्याने त्यांना अपेक्षित यश येत नसल्याची खंत पोलीस अधिकारी व्यक्त करतात. 

महाराष्ट्रात ज्या भागात नक्षलवादी सर्वाधिक सक्रिय आहेत त्या गडचिरोली आणि छत्तीसगडमधील लगतच्या जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान राबविताना येणाऱ्या अडचणी दोन्ही बाजूने सारख्याच आहेत. तरीही छत्तीसगड पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानात आक्रमकता आणि नियोजनाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नक्षलवादी तिकडे मोकळेपणाने वास्तव्य करतात. युवक-युवतींची भरती करून त्यांना प्रशिक्षणही देतात. तेच नक्षली नंतर गडचिरोलीत पाठवले जातात. 

गडचिरोली जिल्ह्यालगतच्या नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यांमध्ये छत्तीसगड पोलिसांनी दर १५ ते २० किलोमीटरवर आऊटपोस्ट निर्माण करून नेटवर्क वाढवणे गरजेचे आहे. ते नसल्यामुळे त्या भागात नक्षलवाद्यांसाठी रान मोकळे आहे. शस्रांच्या कारखाना आणि प्रशिक्षणही त्याच भागात दिले जाते. त्यांचा वापर नंतर महाराष्ट्राच्या हद्दीत केला जातो.      - संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली 

अडीच वर्षांत १४२ नक्षलवादी ‘आउट’नक्षलविरोधी अभियान पथकाने २०१९ ते मे २०२१  या अडीच वर्षांच्या कालावधीत ६० नक्षलवाद्यांना  अटक केली. पोलीस चकमकीत ४१ जण ठार झाले, तर  ४१ जणांनी आत्मसमर्पण केले. अलीकडे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल चळवळीत जाणाऱ्यांची संख्याही बरीच कमी झाली आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र