शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:46 IST

Dhananjay Munde : महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Maharashtra Election Results 2024 : परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल १ लाख ४० हजार २२४ पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. धनंजय मुंडे  झंझावातापुढे राजेसाहेब देशमुख टिकू शकले नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मिळवलेल्या या यशाचे जोरदार कौतुक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इतका लीड घेतला, पेट्या कमी पडल्या अशी मिश्किल विधान केलं.

राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले होते. त्यामुळे शरद पवार यांनीही अनेकदा त्यांना लक्ष्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पराभूत करुन परतफेड केली आहे.  धनंजय मुंडे यांनी राजेसाहेब देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील महायुतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन धनंजय मुंडे यांचं अभिनंदन केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी फडवीसांना शाल देऊन सत्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचे काही न ऐकता त्यांच्याच सत्कार केला. 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार', असं फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं. यावेळी "यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या ग्रेट...." असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजेसाहेब देशमुख यांचा १४०२२४ मतांनी पराभव केला. धनंजय मुंडे यांना १९४८८९ मतं मिळाली. तर, राजेसाहेब देशमुख यांना ५४६६५ मतं मिळाली. धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर निवडून आणलं.               

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस