शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Maharashtra Government: असा असेल महाशिवआघाडीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 10:35 IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाशिवआघाडीकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाशिवआघाडीकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात एकत्र येऊन सरकार स्थापन करायचे याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्याबरोबरच स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल. तर संपूर्ण पाच वर्षे काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद राहील. त्याबरोबरच मंत्रिपदे आणि महामंडळांचे समसमान वाटप करण्याचेही निश्चित झाले आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेला प्रत्येकी 14 मंत्रिपदे मिळतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मंगळवारी रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेमध्ये सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. तसेच अहमद पटेल यांनी काँग्रेसची संस्कृती आणि सरकार स्थापनेतील अटीशर्तींची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल हे दिल्लीला रवाना झाले. आता या बैठकीबाबतचा अहवाल ते सोनिया गांधी यांना देणार आहेत. त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुढील वाटचालीबाबत फोनवरून चर्चा होऊ शकते.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस