शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: भाजपाला विधिमंडळात सिद्ध करावे लागेल बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 04:21 IST

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेता आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून त्यांना पक्षाच्या आमदारांचे समर्थनपत्र देण्याचा अधिकार आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेता आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून त्यांना पक्षाच्या आमदारांचे समर्थनपत्र देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भाजपकडे समर्थनपत्र दिलेही असेल, पण खरी परीक्षा ही विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना असेल. राष्ट्रवादीच्या गटनेत्याचे समर्थनपत्र मिळाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा सरकार स्थापनेचा दावा मान्य करणे राज्यपालांना भाग आहे व त्यानुसार त्यांनी तो मान्य करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी करवून घेतला. पण तो इतक्या सकाळी घेण्याचे औचित्य सांगता येणार नाही.मात्र सध्यातरी अजित पवार यांनी कागदावर समर्थनपत्र सादर केले आहे आणि हे समर्थन त्यांना विधिमंडळात सिद्ध करावे लागणार आहे. राहिला प्रश्न आमदारांच्या अपात्र ठरण्याचा तर आमदारांनी अद्यापपर्यंत पदाची शपथ घेतली नसल्याने सध्या अपात्र ठरण्याचा नियम लागू होत नाही. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. मात्र एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार पक्ष सोडून वेगळा गट स्थापन करीत असल्यास त्यांचे आमदारपद अपात्र ठरत नाही. त्यामुळे आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करतानाच कळेल की त्यांच्याकडे किती आमदारांचे समर्थन आहे. विधिमंडळात राष्ट्रवादीच्या समर्थनाने बहुमत सिद्ध केल्यास हे सरकार पुढे कायम राहील, अन्यथा ते सरकार कोसळेल. अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, त्यावेळी अशाचप्रकारे घटनाक्रम घडला होता. त्यावेळी कागदावर खासदारांनी समर्थनपत्र दिल्यानंतर वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती, मात्र अवघ्या १३ दिवसांत सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या घटनाक्रमात त्यांच्याच नेतृत्वातील सरकार १३ महिन्यांत कोसळले होते. त्यामुळे विधिमंडळात बहुमत सादर करताना काय घडामोडी घडतात, यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.- अ‍ॅड. फिर्दोस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाPoliticsराजकारण