शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:40 IST

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली.

मुंबई - गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, निवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपाच्या या उमेदवारांची मानसिकता सकारात्मक असून, त्यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या 59 उमेदवारांची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. तसेच या उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून एकूण 164 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 105 जागांवर आम्हाला विजय मिळाला. तर 59 जागांवर पराभव पत्करावा लागला. त्यापैकी काही जागांवर अगदी निसटत्या फरकाने पराभव झाला. आज या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. तिथे या पराभवाच्या कारण्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक दिसून आली. त्यांनी आता आगामी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या उमेदवारांनी कामाला सुरुवात केली आहे.'' ''या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पराभूत आमदारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास उपस्थित त्यांनी पराभूत उमेदवारांनी दिला. तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांना राजकीय बळ मिळावे यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सरकारमध्ये तसेच पक्षसंघटनेत सामावून घेण्यात येणार आहे,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019