शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:59 IST

Malegaon Outer Assembly Election Explain in Detail: विधानसभा निवडणुकीत माळेगाव बाह्य मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचा सामना होणार आहे. 

धनंजय वाखारे, नाशिक Malegaon Outer Assembly Election Explain in Marathi : मालेगाव बाह्य मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार मंत्री दादा भुसे आणि दीर्घकाळापासून राजकारणात ठसा उमटविणाऱ्या हिरे घराण्यातील चौथ्या पिढीचे सदस्य व उद्धवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद (बंडू) बच्छाव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मत विभागणी होऊन त्याचा फायदा नेमका कुणाला होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मालेगाव बाह्य मतदारसंघाचे सलग चार टर्मपासून दादा भुसे प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भुसे आता सलग पाचव्यांदा विधानसभेत जाण्यास इच्छुक आहेत. त्यांना हिरे घराण्यातून आव्हान देण्यात आले आहे. माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू व माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे सुपुत्र अद्वय हिरे उद्धवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत.

लोकसभेला भाजप उमेदवाराला मताधिक्य 

मालेगाव बाह्य हा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी करणारे भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना या मतदारसं- घातून ५५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. डॉ. भामरे यांना लगतच्या मालेगाव मध्य मतदारसंघातून अतिशय अल्प मतदान झाले. परंतु, भुसे यांनी आपल्या बाह्य मतदारसंघातून मताधिक्य देऊनही भाजपमध्ये मात्र दोन गटांत यावरून मतभेद आहेत.

दशकभरानतर हिरे घराणे मैदानात 

मतदारसंघात भाऊसाहेब हिरेंपासून ते प्रशांत हिरे यांच्यापर्यंत हिरे घराण्याचे सत्तेत स्थान राहिले आहे. २००९ मध्ये दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केल्यानंतर २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत हिरे घराणे मतदारसंघातून दूर गेले. आता दशकभरानंतर पुन्हा एकदा अद्वय हिरे यांच्या माध्यमातून भुसे यांना आव्हान उभे करण्यात आले आहे. ही लढत उद्धवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा गेल्या चार दशकांपासून गाजतो आहे. मतदारसंघाला मंत्रिपद लाभूनही हा प्रश्न सुटू शकला नसल्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात प्राधान्यक्रमावर असेल. 

मांजरपाडा प्रकल्पासह सिंचनाच्या मुद्द्याबरोबरच अद्वय हिरे यांच्यावरील जिल्हा बँकप्रकरणी झालेली कारवाईही कळीचा मुद्दा ठरू शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmalegaon-outer-acमालेगाव बाह्यShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे