शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:30 IST

उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंविरोधात माहिम मतदारसंघात उमेदवार उतरवला असून माहिममध्ये पुन्हा भगवा फडकवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघाची लढत चुरसीची होणार आहे. कारण याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनीही या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत होईल. एका सर्वसामान्य व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी न्याय दिला आहे. या मतदारसंघात जनतेच्या मनातला सामान्य आमदार भेटेल अशी पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी दिली आहे.

माध्यमांशी महेश सावंत यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,  आजपर्यंत आम्ही जनतेची सेवा केली आहे. कुठल्याही कामासाठी रात्री अपरात्री धावून गेलो आहे. जनतेच्या मनातला सामान्य आमदार त्यांना भेटेल. माझ्यासमोर कोण उभे आहे हे मी बघत नाही. आम्ही काम करत असतो, जनतेची सेवा करतो. मी कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. कोण काम करणार आणि कोण घरी बसणार हे जनतेला माहिती आहे. जनता २० तारखेला मतदान करतील त्यानंतर २३ तारखेला आमचा जल्लोष बघा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच ठाकरे घराण्यातील उमेदवार असल्याने काही टेन्शन नाही, उद्धव ठाकरे निवांत आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा काही फरक पडणार नाही. माहिम मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणार आहे. कितीही आव्हान असेल तर जनतेला रात्री मदतीला धावून येणारा उमेदवार त्यांना भेटला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होती तसेच काम होणार आहे. या मतदारसंघात १०० टक्के विजय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा होणार आहे अशी खात्री असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलं.

दरम्यान, विजय आमचाच होणार असून २३ नोव्हेंबरला अशाचप्रकारे जल्लोषात तुम्हाला मुलाखत देणार. पक्षप्रमुखांनी सर्व इच्छुकांना बसवलं, सर्वांनी एकदिलाने काम करा. माहिम मतदारसंघात पुन्हा भगवा फडकलाच पाहिजे. सत्ता आपलीच आहे. जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही न्याय देऊ असं उद्धव ठाकरेंनी कानमंत्र दिल्याचेही महेश सावंत यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेmahim-acमाहीम