शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:52 IST

Maharashtra Election 2024 Latest Update: महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. पाटणमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. तर भाजपची दोन ठिकाणी शरद पवार गटाशी टक्कर आहे. 

नितीन काळेल, सातारा Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News: विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील लढतीचे चित्र झाले स्पष्ट असून, वाई आणि फलटणला दोन्ही राष्ट्रवादीतच सामना रंगणार आहे. यामध्ये काका की पुतण्या भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर भाजपची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी दोन ठिकाणी काटे की टक्कर होईल. पाटणला दोन सेना समोर येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा मतदारसंघ वाटपाचा तिढा जवळपास संपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतीचे चित्रही स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघांतील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्हीही गट काही ठिकाणी समोरासमोर आहेत.

फलटण विधानसभा : चव्हाण विरुद्ध कांबळे 

फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमदार दीपक चव्हाण रिंगणात आहेत. अजित पवार गटाकडून सचिन कांबळे दंड थोपटत आहेत. याठिकाणी चव्हाण यांच्या पाठीशी राजेगट तर कांबळे यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाची ताकद मिळणार आहे.

वाई विधानसभा : पाटील विरुद्ध पिसाळ

वाईत राष्ट्रवादी अजित पवार गटातून आमदार मकरंद पाटील आहेत. शरद पवार गटाचा उमेदवारही निश्चित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीतच संघर्ष आहे.

भाजपचा दोन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी सामना आहे. माणमध्ये भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शेवटच्या टप्प्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

घोरपडेंसमोर पाटलांचे आव्हान

तसेच भाजपने कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांना उतरवले आहे. याठिकाणी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी तगडा मुकाबला करावा लागेल. 

भाजपला एकाच ठिकाणी काँग्रेसबरोबर संघर्ष करावा लागेल. कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भाजपचे अतुल भोसले यांचा पुन्हा सामना होईल. सातारा मतदारसंघात भाजपच्यासमोर उद्धवसेना आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अमित कदम यांच्याशी भिडतील.

पाटणला बंडखोरी; तिरंगी सामना... 

पाटण मतदारसंघात शिंदेसेना आणि उद्धवसेना समोरासमोर येत आहेत. शिंदेसेनेने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धवसेनेकडून हर्षद कदम रिंगणात आहेत. 

याठिकाणी पाटणकर गटानेही दंड थोपटले आहेत. त्यामुळे सत्यजीतसिंह पाटणकर मैदानात उतरत आहेत. यामुळे आघाडीत बंडखोरी होण्याने तिरंगी लढत होणार आहे. 

कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज सामना आहे. सलग दुसऱ्या निवडणुकीत दोघे शिंदे समोरासमोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लढती संघर्षाच्या ठरणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस