शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: महायुती २०० चा आकडा पार करणार नाही; शिवसेनेच्या मोठ्या नेत्यानं केलं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 14:35 IST

१३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी मतदानाचा हक्क बजावित आहे. अशातच शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मोठं विधान केले आहे. राज्यात महायुतीला २०० जागा पार करता येणार नाही. असं भाकीत शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलं आहे. 

एकीकडे राज्यात महायुतीचं वारं जोरदार असून ही महायुती २२० चा आकडा पार करणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केलेलं हे विधान महत्वाचं आहे. मनोहर जोशींचे हे विधान भाजपा नेत्यांसाठी घरचा आहेर आहे. याबाबत बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीबाबत निश्चित काही सांगणं अशक्य असतं. त्यामुळे महायुती २०० जागांचा आकडा पार करेल असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर आदित्य ठाकरे असतील, मी पक्षनेतृत्वाविरुद्ध कधीच जात नाही, मी कायमच पक्षाची शिस्त पाळणारा शिवसैनिक आहे त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मुंबईतील अनेक सेलिब्रिटींनी अतिशय उत्साहात मतदान केले. 

दरम्यान, राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय नेते नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुधीर मुंनगंटीवार, बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, उदयनराजे भोसले, एकनाथ शिंदे, अविनाश जाधव, सत्यजित तांबे, इम्तियाज जलील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी मतदान केले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019