शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 19:24 IST

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. बँकांचे घोटाळे समोर येत आहेत. मात्र असं असूनही पंतप्रधान मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, जीएसटी, नोटबंदीवरुन राहुल यांनी चांदिवतील प्रचारसभेत मोदींना लक्ष्य केलं. काँग्रेस नेते नसीम खान यांच्यासाठी राहुल चांदिवलीत आले होते. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकांना खूप आश्वासनं दिली होती. मात्र आज सर्वसामान्य जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 'मोदी सरकारनं गब्बर सिंग टॅक्स लावून जनतेचं कंबरडं मोडलं. काळा पैसा नष्ट करायचा असल्याचं सांगून मोदींनी नोटबंदी केली. नोटा बदलण्यासाठी मुंबईकर रांगेत उभे होते. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा होता, ते थेट देशाबाहेर पळून गेले. आज लहान उद्योग बंद होत आहेत. धारावीतील उद्योग संकटात. याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर कडाडून टीका केली. मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काहीच बोलत नाही. बँक घोटाळे होतात. मात्र त्यावरही भाष्य करत नाहीत. लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. देशातल्या युवा पिढीला भविष्य दिसत नाही. मात्र मोदी देश फिरण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली. 'जीएसटीमुळे कोणाचा फायदा झाला? कोणाचाच नाही. सरकार खरं बोलत नाही. आधी जगात देशाला मान होता. आज मात्र देशात गुंतवणूक येत नाही. व्यवसायिक देश सोडून जात आहेत. भाजप देशाला विभागण्याचे काम करत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी प्रचारसभेत मोदी सरकारवर बरसले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीDemonetisationनिश्चलनीकरणblack moneyब्लॅक मनी