शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 22:51 IST

मोदींमुळे केवळ मोजक्या उद्योगपतींचा विकास झाल्याची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार फक्त 15-20 उद्योगपतींची चौकीदारी करत आहे. सर्वसामान्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून जनतेच्या खिशातील पैसा विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घरात गेला. देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. मात्र मोदी, देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलण्यास अजिबात तयार नाहीत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लगावला. धारावी येथील 90 फूट रस्त्यावर आयोजित पक्षाच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल म्हणाले,  नोटबंदीमध्ये सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले. मात्र अदानी,  अंबानी रांगेत उभे होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लघु, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. धारावीतील युनिट बंद पडत आहेत. मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही. गब्बर सिंह टॅक्समुळे (जीएसटी) फायदा झालेला एकतरी व्यापारी तुमच्या नजरेत आहे का ? सरकारने अनेक कायदे बदलले. मात्र जीएसटी कायदा बदलण्यास ते तयार नाहीत. अर्थव्यवस्थेची अवस्था अशीच राहिली, तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बेरोजगार तरुण, शेतकरी, त्रासलेली जनता सरकारकडे न्याय मागत आहे त्यांना न्याय मिळाला नाही तर हा वर्ग सरकारकडून झगडून न्याय मिळवेल. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद मूठभर उद्योगपतींमध्ये नाही, तर सर्वसामान्य तरुण,  शेतकरी, लघु व मध्यम उद्योजक यांच्यामध्ये आहे. त्यांच्या हातात घातलेली अडचणीची बेडी काढल्यास चमत्कार होईल. मात्र हे करण्याची विद्यमान सरकारची क्षमता नाही. हे काम काँग्रेसच करु शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. सरकारने कर्जमाफी केल्याचा दावा केला होता. मात्र तुमच्यापैकी कुणाचे कर्ज माफ झाले आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कुणाचेही नाही असे उत्तर उपस्थितांमधून आले. पैसा गोरगरीबांचा व त्यातून अदानी,  अंबानी मौजमजा मारतात असा आरोप त्यांनी केला. मोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रुपये देण्याऐवजी लहान उद्योजकांना निधी उपलब्ध करुन दिल्यास अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल असे ते म्हणाले. देशातील सर्वसामान्य पुढे जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने देश पुढे जाईल. छोटे दुकानदार, लघु ,मध्यम उद्योजकांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले हा प्रश्न मोदी नेहमी  विचारतात. पाच वर्षांत जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान मोदींच्या सरकारने केले. ते कॉंग्रेसने केले नाही असा पलटवार त्यांनी केला. मेक इन इंडियाची घोषणा करणाऱ्यांनी मेक इन धारावीकडे दुर्लक्ष केले. धारावी गरिबांची शक्ती आहे. प्रत्येक शहरात धारावी आहे. तुम्ही धारावीला समजू शकला नाहीत, तर देशाला समजू शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था