शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: Video : नियम धाब्यावर ठेऊन खासदार सुसाट, बुलेटवरून ट्रिपल सीट प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:04 IST

Maharashtra Election 2019: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

मुंबई - उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या बेधडक शैलीमुळे परिचित आहेत. मात्र, त्यांचा हा बेधडकपणा आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांची मने जिंकण्यासाठी ओमराजेंनी वाहतुकीचे नियमच धाब्यावर बसवले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासमवेत गाडीवर बसलेले स्थानिक नेतेही बिनधास्तपणे वागताना दिसत आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उस्मानाबाद मतदारसंघातुन शिवसेनेकडून खा.ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत. पाटील यांच्यासाठी ओमराजे गावोगावी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. मात्र, ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये, ओमराजे एका बुलेटवरुन ट्रिपल सीट प्रवास करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला कार्यकर्त्यांनी मोठ्या हौसेनं व्हायरल केलं. मात्र, जबाबदार नागरिकांकडून जेव्हा, वाहतुकीचे नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीच असतात का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन काढून टाकला आहे. मात्र, तो इतर ग्रुपमध्ये व्हायरल झाला आहे. खासदार महोदयांनीच ट्रीपल सीट प्रवास करुन वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे, अनेकांनी त्यांच्यावर काय कारवाई होणार? की नेता असल्यामुळे त्यांना सूट मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

टॅग्स :osmanabad-acउस्मानाबादAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा