शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान, म्हणाले ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:49 IST

उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांची संगमनेर येथील सभेला उपस्थिती

अहमदनगर - संगमनेर येथील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांची प्रचारसभा आज येथे झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तसेच त्यांच्या सभास्थानी असलेल्या उपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी आले आहेत.ते जंगलात रमणारे माणूस आहेत, असे स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार मैदानात आहे. दरम्यान, नवले यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज संगमनेर येथे झाली. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हेही सभेवेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर तेजस ठाकरे हे सुद्धा सक्रिय राजकारणात उतरणार का, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. मात्र स्वत: उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे केवळ सभा पाहण्यासाठी आले असून, ते जंगलात रमतात, असेही स्पष्ट केले.'' 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाजीप्रभू देशपांडें संदर्भात केलेल्या विधानावरून बाळासाहेब थोरात यांच्यावर  जोरदार टीका केली, ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, थोरात साहेबांनी आता घरी जायला हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेब तुमचा नेता बँकॉकला पोहोचला आहे तुम्ही काळजी करू नका, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.    

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAhmednagarअहमदनगर