Maharashtra Election 2019 : पहिलवानांच्या आखाड्यात किन्नरांची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:39 AM2019-10-14T05:39:50+5:302019-10-14T05:40:00+5:30

विधानसभा निवडणुकीचे रण तापले असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Maharashtra Election 2019 : they jumps in the wrestler's arena of politicians | Maharashtra Election 2019 : पहिलवानांच्या आखाड्यात किन्नरांची उडी

Maharashtra Election 2019 : पहिलवानांच्या आखाड्यात किन्नरांची उडी

Next

- धनंजय वाखारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पहिलवान आणि नटरंगच्या वादात आता किन्नरांनी उडी घेतली असून, राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शी येथील जाहीर सभेत केलेल्या हातवाऱ्यांबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. निवडणुकीत अशाप्रकारे हीन पातळीवर होणारा प्रचार वेदनादायी असून, महाराष्टÑाच्या संस्कृतीला ते शोभत नाही. हा तर विचारसंहितेचाच भंग आहे. आमच्यात शिवाची शक्ती असून, त्यापुढे पुरुष आणि स्री हे दोन्हीही येत नसल्याची भावना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल गुरु यांनी ‘लोकमत’शी बोलून दाखविली आहे.


विधानसभा निवडणुकीचे रण तापले असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विरोधक थकले आहेत, आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच उरले नाही’ अशी टीका विरोधकांवर केली. त्याला प्रत्युत्तर राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी येथील जाहीर सभेत दिले. शरद पवारांनी ‘लढाई पैलवानांमध्ये होते, या ‘अशांशी’ नाही हे वाक्य बोलताना विशिष्ट प्रकारचे हातवारे केले होते. पवारांचे हे हातवारे भाजपला झोंबल्यानंतर रविवारी जळगावमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा उत्तर दिले. ‘आम्ही नटरंगसारखे काम केले नाही. आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येते, पण आम्ही देणार नाही’ असे सांगत शरद पवार यांना टोला लगावला. निवडणुकीत पैलवान विरुद्ध नटरंग असा सामना रंगला खरा; परंतु त्याला आता किन्नरांनी आक्षेप घेत खालच्या पातळीवर जाऊन घसरलेल्या राजकारणाबद्दल नापसंती दर्शविली आहे. रविवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडावर छबिना उत्सवानिमित्त देशभरातील शेकडो तृतीयपंथी एकत्र आले आहेत. त्यावेळी किन्नरांच्या महंत पायल गुरू यांनी राजकारणात किन्नरांना ओढल्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्यातील प्रगल्भ म्हणविणाºया राजकारण्यांकडून अशा प्रकारचे हातवारे अथवा विधाने अपेक्षित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अचूक पडली ठिणगी...
निवडणुकीतील पहिलवान-नटरंग या वादामुळे पुन्हा एकदा नटरंग सिनेमातील गीतांनाही उजाळा मिळाला आहे. निवडणुकीत घसरलेली ही हीन पातळी लक्षात घेता, नटरंग सिनेमातील ‘अचूक पडली ठिणगी, पेटलं सारं रान, काळ येळ इसरलं गडी, ºहाईलं न्हाई भान, चढू लागला रंग, दंग सारी दिनरात, पर मधेच शिंकली माशी, झाला की हो घात’ या गीताच्या ओळींबरोबरच ‘खेळ मांडला’ या गीतांचा आधार घेत पवारांवर सोशल मीडिया मात्र तुटून पडली आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे; परंतु दुसºयांच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. निवडणुकीत ज्या प्रकारे आरोप-हातवारे सुरू आहेत, ते महाराष्टÑाच्या संस्कृतीला शोभेसे नाही. हा विचारसंहितेचाच भंग आहे. आमच्यात तर शिवाची शक्ती आहे. आमच्यापुढे पुरुष आणि स्री दोन्हीही येऊ शकत नाही. राजकारणाच्या या लढाईत माणूसधर्माला प्राधान्य द्या, त्यामुळे देशाचे भले होईल.
- पायल गुरु, महामंडलेश्वर, महाराष्टÑ किन्नर आखाडा

Web Title: Maharashtra Election 2019 : they jumps in the wrestler's arena of politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.