शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

महाराष्ट्र निवडणूक 2019: तोडगा निघाला तरच शिवसेनेला पाठिंबा; जयंत पाटील यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:24 IST

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील

इस्लामपूर (जि. सांगली) : राजकारणात स्वप्न बघणे योग्य नाही. राजकारणात सर्व काही झाल्याशिवाय खरे मानायचे नाही. शिवसेनेला तत्त्वत: पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटचा ५० वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम आमदार पाटील व त्यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्याहस्ते झाला. पाटील म्हणाले, येथील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघता, आपले सरकार आल्याचा आनंद दिसतो आहे. मात्र सरकार नाही आले तरी दु:खी होण्याची गरज नाही. सक्षम विरोध करण्याएवढे संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे.राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यश मिळण्यासाठी अजून ८ ते १० दिवसांचा कालावधी लागेल. मंगळवारी मला दिल्लीला जावे लागणार आहे. तेथे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा होईल. शेवटी राजकारणातील निर्णय वरिष्ठ स्तरावर होतात, ते स्वीकारावे लागतात, असे सांगत आ. पाटील यांनी सरकार स्थापनेचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला....तरच पूर्ण एफआरपी देणे होईल शक्यएफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांवर वाढणारा कर्जाचा बोजा धोकादायक आहे. एफआरपीसाठी कर्ज देण्याऐवजी केंद्र सरकारने साखरेला ३४ ते ३५ रुपयांचा दर दिला, तर बाजारातून पैसे मिळतील. त्यामुळे एफआरपीसाठी कर्ज काढावे लागणार नाही. यासाठी केंद्राकडे आग्रह धरला जाईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस