शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ३० टक्के नोकरदारांना सरकार लवकरच नारळ देणार; राज ठाकरेंचा मोठा बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 21:25 IST

आर्थिक मंदी, बेरोजगार, शेतकरी आत्महत्यांवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

भिवंडी: देशातील आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आधी खासगी उद्योगांपर्यंत असलेलं संकट आता सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहे, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनीभाजपा सरकारला लक्ष्य केलं. राज्य सरकार ३० टक्के कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ देणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्यादेखील सुरक्षित नाहीत हे स्पष्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.राज ठाकरेंनी त्यांच्या भिवंडीतील सभेत आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीएमसी बँकेवरील संकटांवरुन सरकारवर तोफ डागली. खासगी नोकऱ्यांपाठोपाठ आता सरकारी नोकऱ्यादेखील जाणार आहेत. २०१४ मध्ये भाजपा विचारत होती, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता आम्ही त्यांना विचारतो, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या ५ वर्षांमध्ये १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र आपल्याला काहीच वाटत नाही. कारण आपण संवेदनाशून्य झालो आहोत, असं राज यांनी म्हटलं.तुम्ही तुमचा राग, संताप व्यक्त करत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. त्यामुळेच तुमचा संताप मतदानातून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी केलं. राज्यातील जनतेला कशाचंच काही वाटत नाही. त्यामुळेच सत्ताधारी बेलगाम झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. येत्या काळात जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी मनसे समर्थपणे पाडेल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भिवंडी शहरातील प्रमुख समस्यांवर भाष्य केलं. भिवंडीतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही या भागात राहतातच कसे? तुम्हाला या परिस्थितीचा राग येत नाही का?, असे प्रश्न राज यांनी उपस्थितांना विचारले.नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना रस्ते खड्डेमुक्त होते. उत्तम काम करायचं ठरवल्यास ते होऊ शकतं. पण रस्त्यांच्या कंत्राटांमधून टक्के हवे असतील, तर मग रस्त्यांची कामं व्यवस्थित कशी काय होणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गुजरातमधली टोरंट कंपनी भिवंडीत अव्वाच्या सव्वा बिल आकारते. मात्र लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्या भाषणाला ज्या टाळ्या वाजताहेत, तशीच एखादी टाळी टोरंट कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या गालावर वाजवली असती, तर परिस्थिती बदलली असती, असं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा