शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार, आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 15:07 IST

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झालेला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झालेला आहे. त्यातच राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करणरा असेही संकेत मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालाड येथील हॉटेल रिट्रीट येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना संबोधित केले. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच भाजपाशी असलेली युती अद्याप तुटली नसल्याचे सांगत त्यांनी युतीमधील तणाव निवळण्याची अंधुकशी आशा कायम असल्याचे संकेत दिले आहेत. मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये पक्षाच्या आमदारांना संबोधित करताना काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान,  उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचे विधान केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. तसेच भाजपाशी असलेली युती अद्याप तोडलेली नसल्याचे ठाकरे यांनी म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या बैठकीकडे भाजपाचेही लक्ष लागलेले आहे. दरम्यान, भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, महाजन उपस्थित होते. या बैठकीत राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार खलबते झाली.  दुपारी चार वाजता भाजपाची पुन्हा एकदा बैठक होणार असून, सत्तास्थापनेबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.  या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ''माननीय राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी भाजपाला निमंत्रित केले आहे. या निमंत्रणाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता संध्याकाळी चार वाजता आम्ही पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. त्यानंतर सरकार स्थापन करणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय आम्ही राज्यपालांना कळवणार आहोत,''  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019