शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: युती तुटली का?; उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर टाळलं, पण भाजपाला डिवचलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 21:33 IST

युतीवर भाष्य करणं टाळलं; भाजपाला टोला

मुंबई: बहुमताचा दावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीवर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र भाजपाला डिवचण्याची संधी त्यांनी सोडली नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भिन्न विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना यावेळी उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कसे काय एकत्र येणार, असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. त्यांना भाजपा आणि मेहबूबा मुफ्ती कसे एकत्र आले, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये भाजपा आणि मुफ्ती एकत्र कसे आले? नितीशकुमार-भाजपा कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा सोबत कसे आले? मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भाजपा कसे एकत्र आले?, असे प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केले. भाजपा आणि या विचारधारांचा संगम नेमक्या कोणत्या संगमावर झाला याची माहिती मागितली आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला. यावेळी उद्धव ठाकरेंना युती तुटली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य करणं टाळलं. ज्या गोष्टी करायच्या, त्या बेधडकपणे करेन. आत्ता मी जेवढं बोलतोय तेवढं बोलतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या शुभेच्छांवरदेखील भाष्य केलं. ‘भाजपाने असमर्थता दर्शवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आम्ही भाजपाला मित्र मानतो. मित्रानं दिशा दाखवली असेल आणि त्या दिशेनं न जाणं हा मित्रत्वाला कलंक ठरेल,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या अरविंद सावंत यांचे आभार मानले. मला अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक कडवट असतो. आपल्या पक्षाला दिल्लीत विचित्र वागणूक मिळतेय, हे लक्षात येताच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असेच कडवट शिवसैनिक हीच माझी शक्ती असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस