शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
4
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
6
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
8
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
9
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
10
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
11
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
12
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
13
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
14
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
15
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
16
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
17
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
18
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
19
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
20
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; आयारामांमुळे भाजपाची संस्कृती बदलेल अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 08:44 IST

नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत.

नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच निवडणुकीपूर्वी राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षाला रामराम करत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. 

माध्यमाशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आयारामांमुळे भाजपाचं कल्चर बदलेल अन्यथा त्यांचे कल्चर बदलेल, शेवटी काळाच्या ओघात पक्ष विस्तार करण्यासाठी माणसं जोडावी लागतात. नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत. काँग्रेस मोठा पक्ष होता. त्यातून ते पक्षात आले त्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली असं म्हणत गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाष्य केलं आहे. 

तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपाला अनुकुलता आहे, शिवसेनेसोबतची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. पक्ष मोठा झाला की सगळेच जण प्रवेश करतात. आशिष देशमुख जसं मॉर्निंग वॉक करतात तसं पक्ष बदलत असतात. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. 

दरम्यान, मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला जितक्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या जागा टिकविणं हे आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे, मात्र शिवसेना-भाजपा महायुती चांगल्या घेत पुन्हा निवडून येणार आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. 

नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे विधान केलं असं नाही, तर यापूर्वीही अनेकदा नितीन गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला होता. राज्यातील काही नेते असे असतात जे सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे अनेकदा ही मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असतात. त्यामुळे अशा नेत्यांना लोकांनी धडा शिकविला पाहिजे असं मत गडकरींनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत होते.  विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, वैभव पिचड, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर अशा नेत्यांनी भाजपात प्रवेश केला

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस